तासगाव प्रतिनिधी : रणजीत थोरबोले
सोमवार दि. 21/04/2025रोजी सालाबादप्रमाणे तासगांव मधील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा सालाबादप्रमाणे मोठया उत्साहात पार पडली.
यात्रेचं मुख्य आकर्षण मंदिराला केललं लायटिंग, अग्रभागी उभी केलेली गौरी हत्तीन, बैल गाड्यांची मंदियाळी, तसेच आकर्षक पाळणे, खेळण्यांची स्टॉल, खाऊगल्ली, तसेच अबाल वृद्धाची गर्दी, गर्दीतला आवाज सदोबाच्या नावानं चांगभलं च्या गजरानं आसमंत दुमदूमत होता, रात्री साडे नऊ वाजता पालखी सोहळ्याला गगनाला भिडणाऱ्या सासन काठ्या, हलगी,सनई न तासगाव कर मंत्रमुग्ध झाले.
प्रत्येक तरुणाईच्या चेहऱ्यावर आपल्या गावची जत्रा लई भारी हाच सूर दिसत होता.




