मावळ तालुका प्रतिनिधी: मंगेश आखाडे
दि.28 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी 2024-25 या परीक्षांचा निकाल नुकताच लागला असून रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्यु.कॉलेज वडगाव मावळ या शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.प्राचार्य मा.सतीश हाके सर यांच्या नियोजनाने व मार्गदर्शनाने विद्यालयाने प्रथमच या परीक्षेच्या निकालाचा उच्चांक गाठलेला आहे.विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाचे प्राचार्य सतीश हाके, उपप्राचार्य शिवाजी मोहिते, पर्यवेक्षिका प्रज्ञा गायकवाड , विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे
आणि तालुकास्तरीय गुणवत्ता संवर्धन अभियानामध्ये 1000 पेक्षा अधिक पटसंख्या असणाऱ्या शाळेमध्ये मावळ तालुक्यात वडगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश व ज्यु.कॉलेज या शाळेने माध्यमिक गटात प्रथम क्रमांक पटकवला आहे.पुणे जिल्हा परिषद माध्यमिक विभाग, माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ पुणे यांच्यावतीने हे अभियान शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये राबवण्यात आले होते.पुण्यातील गणेश कला क्रीडामंच येथे झालेल्या समारंभात शिक्षणाधिकारी डॉ.भाऊसाहेब कारेकर,मुख्याध्यापक मंडळाचे विभागीय अध्यक्ष रामराव पाडुळे आदींच्या हस्ते विद्यालयाचे प्राचार्य सतीश हाके आणि सहकाऱ्यांनी हे पारितोषिक स्वीकारले रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी संजय मोहिते, सहाय्यक विभागीय अधिकारी दत्तात्रय गायकवाड,तसेच स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन , सदस्य, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, पालक संघ,माता पालक संघ व ग्रामस्थांनी याबद्दल अभिनंदन केले आहे.




