Breaking

Monday, April 28, 2025

मोडनिंब येथे विलेपार्ले मुंबई येथील जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ सकल जैन समाजाच्या वतीने निषेध मोर्चा


मुख्य संपादक : संतोष पांढरे

विलेपार्ले मुंबई येथील जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ मोडनिंब येथील सकल जैन समाजाकडून दिनांक 27 एप्रिल रोजी मोडनिंब शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला. 

मुंबई ईस्ट विले-पार्ले येथे BMC कडून बेकायदेशीररित्या जैन मंदिर पाडल्याने महाराष्ट्रातील सकल जैन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. जैन समाजाकडून या घटनेचा ठिकठिकाणी मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर माढा तालुक्यातील मोडनिंब येथे सकल जैन समाजाकडून या घटनेचा निषेध व्यक्त करीत शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात मोडनिंब व परिसरातील जैन बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.