Breaking

Tuesday, April 29, 2025

पंचायत समितीच्या वतीने उपळाई केंद्राचे केंद्रप्रमुख व केंद्रातील सर्व शिक्षकांचा सन्मान


मुख्य संपादक : संतोष पांढरे

शैक्षणिक वर्षाच्या शेवटी निपुण भारत निपुण महाराष्ट्र एफ एल एन निपुण भारत अंतर्गत माता गट पालक मेळावे यातून मुलांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे होते.राज्यातील पहिलीच घटना ही असावी,याची दखल घेत कुर्डुवाडी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विकास यादव यांनी उपळाई केंद्राचे केंद्रप्रमुख दिगंबर काळे व केंद्रातील सदोतीस शिक्षकांना अभिनंदन पर पत्र देऊन गौरविण्यात आले.हे प्रमाणपत्र उपळाई गावच्या भारत सरकारच्या सेवेत असलेल्या रोहिनीताई भाजीभाकरे यांच्या मातोश्री सुवर्णालता भाजीभाकरे व  शशिकला नकाते यांच्या हस्ते देण्यात आले.

उपळाई केंद्राची शिक्षण परिषद नंदिकेश्वर विद्यालयात पार पडली सुरवातीला माय सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जीवनात आईच महत्व पटवून देणाऱ्या कविता  सुवर्णलता भाजीभाकरे यांनी सादर केल्या. शशिकला नकाते यांनी जीवनात शिक्षणात गुरुच महत्व खूप मोठे आहे.उपळाई बु,।।उपळाई खु।।, वडाचीवाडी रोपळे खु।।, व परिसरातील प्रत्येक पालकांना आपलं मुलं अधिकारी व्हावं अस वाटत आहे. आपल्या केंद्रातील सर्वांचे काम खूप चांगले आहे असे मत व्यक्त केले. मुख्याध्यापक दशरथ देशमुख यांनी ही मनोगत व्यक्त केले. निपुण ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी टोकाचे प्रयत्न करावेत.सुट्टीत देखील मुलं शिक्षणाच्या प्रवाहात राहतील यासाठी ही नियोजन करून पालकांशी  संपर्क साधून सहकार्य घ्यावे असे केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांनी आपले मत व्यक्त केले. यासह विविध प्रकारचे विषय घेण्यात आले.अभ्यासपूर्ण प्रास्ताविक पांडुरंग शिंदे यांनी केले. आभार शहाजी क्षीरसागर यांनी मानले.

शिक्षण परिषदेचे बहारदार असे सुत्रसंचालन राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षक विठोबा गाडेकर यांनी केले.केंद्रातील सर्व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.