तासगांव प्रतिनिधी : रणजीत थोरबोले
सन 2024/25 मध्ये घेण्यात आलेल्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील महांकाली विद्यानिकेतन व जुनिअर कॉलेज शाळेतील इयत्ता आठवीच्या विध्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केले आहे, त्यामध्ये प्रामुख्याने जिज्ञासा धनाजी सरगर 224 गुण, वेदांत सुनील पाटील 214 गुण, प्राची विजयकुमार शिंदे 198 गुण, महिन मुनाफ हकीम 196 गुण, श्रेया दिलीप बंडगर 190 गुण, सिद्धी दिलीपकुमार जाधव 188 गुण, श्रेया अजित गायकवाड 174 गुण, प्रज्वल प्रकाश सपकाळ 166 गुण, सई अविनाश मोटे 166 गुण, ईश्वरी सोमनाथ म्हेत्रे 154 गुण,वरील सर्व विद्यार्थ्यांनी ऐकून 300 गुणांपैकी वरील गुण मिळवून शाळेच्या व तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला, त्याबद्दल शिक्षक, पालक, मुख्याध्यापक यांच्याकडून विद्यार्थ्यांना शाबासकी तसेच पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.


