राष्ट्रवादीचे नेते उदय दादा माने यांनी हॉलीबॉल खेळाडूंसाठी मैदान तसेच स्वखर्चातून दिले लागणारे साहित्य
मुख्य संपादक : संतोष पांढरे
सामाजिक,शैक्षणिक, राजकीय कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे मोडनिंबचे उदयाकिर्ती एटरप्राईजेसचे मालक,उदयाकिर्ती अर्बन बँकेचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठनेते उदय दादा माने यांना मोडनिंबचे खेळाडू असणाऱ्या तरुणांना हॉलीबॉलचे ग्राउंड नसल्यामुळे सर्व हॉलीबॉल खेळाडू करता ग्राउंड स्वखर्चाने उपलब्ध करून खेळाची आवड निर्माण व्हावी या उदात्त हेतूने मैदान उपलब्ध करून दिल्याने मोडनिंब भागातून समाधान व्यक्त केले जात आहे.तसेच राजकीय काम करीत असताना युवकांनाही शारीरिक व्यायाम करता यावा या उदात्त हेतूने त्यांना सर्व साहित्य सुद्धा उपलब्ध करून दिले.उद्योजक उदय दादा माने यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली मोडनिंब येथे युवकांसाठी हॉलीबॉल खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून त्यासाठी असणारी साहित्य सामग्री उपलब्ध करून दिल्यामुळे युवकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी आकाश दरेकर-कोळी आदित्य माळी, विशाल रनपिसे, शंभूराजे व्यवहारे, ओंकार ओहोळ, अर्णव शहा, अजिंक्य झाडबुके, प्रथमेश शिंदे, आशीतोष पवार, ऋषिकेश गिड्डे, आदित्य गिड्डे, सुयश माने, किशोर रणदिवे, शुभम चवरे, यश यादव, माऊली जाधव प्रज्वल झाडबुके उपस्थित होते.
" भविष्यात तरुणांमध्ये प्रोत्साहन दिल्यामुळे त्यांच्या मनात खिलाडूवृत्ती व खेळाची आवड निर्माण होण्यार मदत होणार असून इच्छुक असणाऱ्या तरुणांच्या सुप्तगुणांना वाव मिळणार आहे.तर भविष्यात एक चांगला खेळाडू म्हणून चमका व आपल्या आई वडिलांचे नाव चमकवा.अशा खेळाडूंना प्रोत्साहन दिल्याने चार मुले एकत्रित करून त्यांना एक नवीन चांगली वाट दाखवून मुले स्वतःच्या पायावर उभी राहतील."
--उदय दादा माने,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उदयाकीर्ती बँकेचे चेअरमन.





