शिक्षक विठोबा गाडेकर यांचा नात जन्मली म्हणून उपळाई येथे ह्या उपक्रमाची सुरुवात
मुख्य संपादक : संतोष पांढरे
दिवसेंदिवस पर्यावरणाचे संतुलन ढासळत चालले आहे पृथ्वीवरील तापमानात प्रचंड मोठी वाढ होत आहे .वातावरणात विषारी वायू चे प्रमाण वाढते आहे.त्यामुळे अनेक प्रकारचे आजार वाढत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदूषणामुळे मानवी जीवन धोक्यात आले आहे.पावसाचे प्रमाण कमी होत आहे अशा सर्व समस्येवर उपाय म्हणजे वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे.घरासमोर शेतात बांधावर शाळेच्या आवारात रस्त्याच्या दुतर्फा माळरानावर झाडे लावून त्याची मुलासारखी जोपासना करावी तरच मनुष्य जीवन सुखमय होईल अन्यथा येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही असे मत केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले ग्रामीण विकास मंत्रालय, ग्रामीण विकास विभाग ,भारत सरकारच्या संयुक्त सचिव तथा उपळाई बुद्रुक च्या कन्या रोहिणी ताई भाजीकरे यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी मुख्यकार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नवजात बाळाच्या नावाने वृक्षारोपण...मुलीचा जन्म झाला की पाच झाडांची लागवड करायची हाच धागा पकडून केंद्रातील हुशार व उपक्रमशील शिक्षक विठोबा गाडेकर यांनी नात जन्मली म्हणून महाराणी लक्ष्मीबाई कन्या प्रशाला या ठिकाणी हा उपक्रम प्रथम उपळाई येथे राबवत आहोत असे मत व्यक्त केले.सर्वजण याचे अनुकरण करतील असा विश्वास आहे.रामदास भाजीभाकरे ,श्रीकांत काशीद ,विठोबा गाडेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.उपक्रमाचे महत्व पटवून दिले.
प्रथम पांडुरंग शिंदे यांनी प्रास्ताविक केले.उपस्थितांना झाडे देऊन स्वागत पर सत्कार करण्यात आला.विठोबा गाडेकर यांनी हा उपक्रम घेतल्याबद्दल त्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.वड, पिंपळ यासारखी पाच झाडे रोहिणीताई भाजीभाकरे यांचे पिताश्री रामदास भाजीभाकरे ,मातोश्री सुवर्णा भाजीभाकरे, प्रगतशील बागायतदार शरदभाऊ पाटील, सरपंच सुमनताई माळी ,केंद्रप्रमुख दिगंबर काळे, गणेश गुंड ,राजू नकाते ,अरविद नकाते ,विनोद गाडेकर यांच्या हस्ते लावण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कन्या प्रशालेचे सर्व शिक्षक व केंद्रातील शहाजी क्षीरसागर बंडू भोरे धनाजी घाडगे सूर्यकांत उबाळे शर्मिला वाघ यांनी परिश्रम घेतले.आभार अनिल काळे यांनी मानले.यावेळीपरिसरातील पर्यावरणप्रेमी शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




