Breaking

Friday, May 2, 2025

पंढरपूर परिविक्षाधीन IPS अंजनाकृष्णा व्ही एस व टेंभुर्णी PI नारायण पवार यांच्या पथकांकडून वेश्याव्यवसाय करणाऱ्या परिते(ता.माढा)येथील साई कला केंद्रावर धाड


9 पैकी 5 पुरुषांना पोलीस कोठडी व 4 महिलांना न्यायालयीन कोठडी

मुख्य संपादक : संतोष पांढरे(मोडनिंब)

पंढरपूर टेंभुर्णी पोलीस पथकाची कारवाई-मंगळवारी रात्री अकराच्या दरम्यान आर्थिक फायद्यासाठी साई कला केंद्रातील पार्टी मालकीण त्यांच्याकडील महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलिसांना समजली. यावेळी कलाकेंद्रामध्ये डमी गिऱ्हाईक पाठवून वेश्याव्यवसाय चालतो का ? याची खात्री करून घेतली. यानंतर पोलिस पथकाने कारवाई केली.यावेळी अटक केलेले नऊ संशयित आरोपी परजिल्ह्यातील विविध गावांतील तेरा महिलांना कलाकेंद्रात आणून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नऊ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात पोलिस उपनिरीक्षक ज्योती गोविंद बैनवाड यांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.या आरोपींना अटक करून माढा न्यायालयात हजर केले असता, राजकुमार पवार(परिते),धीरज चौंधे(टेंभुर्णी), दादाराव चव्हाण(परिते),रोहन चव्हाण(परिते),सचिन सावंत(परिते) यांना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी तर कविता पवार(टेंभुर्णी),रमा शिंदे(नागझरी,बीड), शारदा चंदनकर(मोडनिंब) व रिजवान शेख(खंडाळी,लातूर)या महिला आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. कलाकेंद्रातील १३ महिलांची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

                               पोलीस निरीक्षक : नारायण पवार साहेब