मुख्य संपादक : संतोष पांढरे(मोडनिंब)
मोडनिंब गावाचे ग्रामदैवत श्री वेताळ देवस्थान यात्रेस शनिवार दि.10 मे 2025 पासून सुरुवात होत असून यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी सरपंच तथा श्री वेताळ देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष अरुण उर्फ कुरण (अण्णा) गिड्डे यांनी दिली.
शनिवार दि १० मे रोजी ह.भ.प सागर महाराज बोराटे (फलटण) यांचा कीर्तन सोहळा, रविवार दि.११ मे रोजी सकाळी सात वाजता नरसिंह जयंती निमित्त महाभिषेक,दुपारी चार वाजता तोरण्या देवस्थानाकडे, संध्याकाळी सात वाजता देव आणण्याचा कार्यक्रम, संध्याकाळी आठ वाजता ह.भ.प. शिवलीला ताई पाटील यांचा कीर्तन सोहळा.सोमवार दि.१२ मे रोजी पहाटे चार वाजता श्रींचा महाभिषेक सोहळा, संध्याकाळी श्रींचा छबिना व भाकाणूक, सोंगाच्या गाड्या (पौराणिक), व शोभेचे दारुकाम.मंगळवार दि. १३ मे रोजी सकाळी श्री च्या पालखीची भव्य मिरवणूक, भेदी गाणी व कलगीतुरा, संध्याकाळी सोंगाच्या गाड्या(डिजिटल), शोभेचे दारुकाम, वैभव म्युझीकाल नाईट कोल्हापूर प्रस्तुत "माहेराला ये ग माझ्या बहिणी" हे नाटक.बुधवार दि. १४ मे रोजी दुपारी पाच वाजता जंगी कुस्ती मैदान, संध्याकाळी सोंगाच्या गाड्या (आधुनिक), संध्याकाळी नऊ वाजता शैलेश लोखंडे प्रस्तुत "बारा गावाच्या बारा अप्सरा,पुणे".गुरुवार दि. १५ मे रोजी संध्याकाळी नऊ वाजता गुणवंतांचा सत्कार समारंभ, व अनिल जाधव प्रस्तुत ऑर्केष्ट्रा "धुमाकूळ बारामती".यात्रेनिमित्त दररोज सर्व भाविकांसाठी राजवाडा हॉल येथे महाप्रसाद देण्यात येणार आहे.यातील यंदाचे खास आकर्षण भव्यदिव्य असा डायनासोर,नरसिंह अवतार,नंदी,15 फुटी कोंबडा सोबत 5 कोंबडे तसेच नवीन नाविन्यपूर्ण भव्य आकर्षक चार कटपुतल्या आणखी नवनवीन सोंग सोंगाच्या गाड्यात आपणास बघायला मिळणार आहेत.
श्री वेताळ देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थासह अध्यक्ष कुरण अण्णा गिड्डे, उपाध्यक्ष संभाजी लादे, सचिव विजय खेलबुडे, प्रकाश गिड्डे (साहेब),सदस्य बालाजी पाटील, नागनाथ उर्फ फंटू माने, हनुमंत यादव, नाना बिनगे, सुरेश साळुंखे, युवराज पवार, प्रकाश कोळी, सचिन खरात, रत्नदीप गुरव, चंदन गुरव, उज्वल गुरव, बाळू जाडकर, काका हागे, संभाजी काळे, सोमनाथ शिंदे, अनिल पाटील,नंदकुमार लादे, सचिन सोमासे, प्रकाश डोंगरे, सौदागर शिंदे, शिवाजी उर्फ बच्चू गोरे ,राजेश निंबाळकर,सत्यवान बिनगे, बाळासाहेब माने, अरविंद कुंभार, उदय जाधव, दिलीप खडके, गणेश कुंभार, अनिल खडके, शिवाजी लोखंडे, पोपट कोळी, बंडू व्यवहारे, सागर सुर्वे, राजेंद्र खडके यांच्यासह सर्व ग्रामस्थ मंडळी परिश्रम घेत आहेत.यात्रेच्या कालावधीत दरवर्षी प्रमाणे यंदाही भांडण-तंटा न करता शांततेत, स्वच्छता राखून, शिस्तबद्ध पार पाडण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांनी "आपली यात्रा " म्हणून सहकार्य करावे. असे आवाहन श्री वेताळ देवस्थान ट्रस्ट कमिटी च्या वतीने करण्यात आले आहे.




