मुख्य संपादक : संतोष पांढरे(मोडनिंब)
मोडनिंब (ता.माढा) येथील श्री वेताळ देवस्थान ची यंदा सहा दिवस चालणारी यात्रा व यात्रा कालावधीत होणाऱ्या कार्यक्रम साठी तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त होणारे कार्यक्रम व मिरवणूक या पार्श्वभूमीवर यासंदर्भात संयुक्त रित्या शांतता कमिटीची बैठक ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवारी पार पडली. या बैठकीस टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार व त्यांचे सहकारी पोलिस हवालदार आतार, पोलिस हवालदार देवकर, पोलिस हवालदार वाघमोडे, पोलिस कॉन्स्टेबल इंगोले,गोपाळ शिंदे, बापू दगडे उपस्थित होते.सुरुवातीस टेंभुर्णी पोलीस स्टेशन चा नुकताच पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक नारायण पवार साहेबांचा ग्रामपंचायत मार्फत सत्कार करण्यात आला.
तद्नंतर बैठकीत यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची त्यांनी माहिती दिली.सार्वजनिक शांतता राखण्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही पोलीस निरीक्षक पवार यांनी यावेळी केले.डिजिटल बोर्ड बद्दल गावकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचे त्यांनी स्वागत व कौतुक ही केले मात्र यात्रा परिसर सोडून लागणारे बोर्ड कधी किती कालावधी साठी लावणार आहेत. तसेच यात्रे नंतर ही नेहमी लागणारे बोर्ड यासंबंधी ग्रामपंचायत सुचना दिल्या आणि परवानगी /परवाना मध्ये भंग झाल्यास कायदेशीर कारवाई ही केली जाईल.मिरवणुकीत वाजणाऱ्या डीजे च्या आवाजाच्या मर्यादा नोटीस द्वारे आपणांस दिल्या जातील.प्रशासनने दिलेल्या नियम व अटी पाळण्याच्या सूचना त्यांनी देऊन उल्लंघन केल्यास ही कायदेशीर कारवाई करण्यात येईल हे ही यावेळी पवार साहेबांनी स्पष्ट केले.या बैठकीत वाहतूक व्यवस्थापन,गर्दी नियंत्रण,आदी महत्त्वाच्या बाबींवर सविस्तर चर्चा झाली.वाहतूक व गर्दी व्यवस्था जिथे व ज्या ठिकाणी कोलमडली जाईल असे वाटत असेल त्या ठिकाणी पोलीस यंत्रणेचे ऐकून सर्वांनी साथ द्यावी.असे ही सांगण्यात आले.यात्रेच्या पूर्वतयारीबाबत आढावा घेण्यात आला.
पोलिस निरीक्षक नारायण पवार आवर्जून म्हणाले मोडनिंब पंचक्रोशीतील अवैध धंदे बंद करण्यासाठी माझा नेहमीच प्रयत्न राहणार.
प्रशांतजी गिड्डे यांनी रस्ता पूर्णपणे मोकळा राहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा पांढऱ्या पट्ट्या मारून बाऊंड्री करावी व त्या बाहेरच दुकाने/स्टॉल्स लावली जावीत जेणेकरून रस्त्यावरील गर्दी टाळता येईल व रस्ता मोकळा राहील ह्या सबंधित चर्चा ट्रस्ट मंडळी बरोबर केली. यावेळी श्री वेताळ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष कुरण गिड्डे, उपाध्यक्ष संभाजी लादे,सचिव विजय खेलबुडे,कैलाश दादा तोडकरी,उपसरपंच अमित कोळी,नागनाथ (नाना)ओहोळ, प्रकाश गिड्डे, सोलापूर जिल्हा मनसे अध्यक्ष प्रशांत गिड्डे,एकनाथ नाना सुर्वे,ग्रामपंचायत सदस्य बालाजी भाऊ पाटील,सदाशिव पाटोळे,हनुमंत कुंभार गुरुजी, चंद्रकांत(आबा) गिड्डे, शिवाजी ऊर्फ बच्चु गोरे, राजेश निंबाळकर, एकनाथ सुर्वे,जयवंत ओहोळ, प्रकाश डोंगरे, उदय जाधव,हनुमंत पाटोळे, पप्पू गिड्डे,संतोष पाटील, दिपक सुर्वे, राहुल पाटील, किरण खडके, ऋषिकेश कोठावळे, पृथ्वीराज पाटील, प्रमोद गाडे,बालाजी वाघमारे, ऋषिकेश पाटील, आप्पा पाटील, अतुल गाडे, अमोल पवार, रत्नदीप गुरव,यांच्यासह सर्व पत्रकार बंधू व समस्त ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.



