मोहोळ प्रतिनिधी
शेटफळ येथे अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी मूर्तीचे पूजन करून मानवंदना देण्यात आली खरोखरच अहिल्याबाई होळकर यांचे कार्य महिला युवक यासाठी प्रेरणादायी असून त्यांचे विचार अमलात आणले तर निश्चित मध्ये प्रत्येक समाजाची प्रगती होईल व समाजामध्ये जागरूकता येईल असे प्रतिपादन संजय पुजारी यांनी केले यावेळी समता परिषदचे जिल्हा परिषदेचे प्रमुख कुंडलिक माळी सर यांनीही व मार्गदर्शन केले. यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्यात 123 दात्यांनी रक्तदान केले. कुर्डूवाडी ब्लड बँक यांच्यावतीने हे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये उत्साहाने समाजातील युवकांनी प्रेरित होऊन हे रक्तदान केले असून खरोखरच रक्ताची गरज असेल त्यावेळेस रक्तदान करणे हे गरजेचे आहे आणि त्यामधून रुग्णांना त्याची फायदा होईल व रक्तदान हे श्रेष्ठदान असून त्यामध्ये कुठलाही दुजाभाव न करता रक्तदान करणे ही काळाची गरज आहे यावेळी अशोक पुजारी राष्ट्रीय समाज पक्ष अध्यक्ष ,सिद्धाराम पुजारी माजी ग्रामपंचायत सदस्य, बाळासाहेब पुजारी,विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सैनिक कैलास लवटे, देविदास पुजारी,श्रीकांत पुजारी सर,नागनाथ पुजारी, संजय पुजारी, नितीन लवटे, अमोल पुजारी,विकास सोसायटी चेअरमन युवराज पुजारी,धोंडीबा पुजारी,सागर लवटे,अर्जुन खडके,विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुकानंद भांगे,विजय भांगे असे असंख्य अहिल्या प्रेमी यावेळी उपस्थित होते शेवटी सागर पुजारी यांनी आभार मानले.



