मुख्य संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब)
तर सहसचिव पदी बालाजी वाघ व खजिनदार पदी संभाजी वागज यांची निवड
मोडनिंब येथील कमलापती हाईटस येथे आज दिनांक 28/5/2025 रोजी श्री वेताळ पत्रकार संघ मोडनिंब ची स्थापना करण्यात आली. प्रथमत: ग्रामदैवत श्री.वेताळसाहेब व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिटींगला सुरुवात झाली. सदर मिटींगची प्रस्तावना विजयकुमार परबत यांनी केली. पत्रकारांच्या अडचणी, पत्रकारांवर होणारे अन्याय, पत्रकारांना शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या सुविधा व त्याचा पाठपुरावा करणे, श्री वेताळ पत्रकार संघ स्थापन करण्यापाठीमागचा हेतू, तसेच पत्रकारांना असणारे संरक्षण याबाबत प्रस्तावनेत परबत सर यांनी माहीती सांगितली. त्यानंतर प्रा.संतोष लोकरे सर यांनी पत्रकार बांधवांना मार्गदर्शन केले. तसेच यावेळी आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला. व त्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार पदाबाबत मिटींग मध्ये चर्चा झाली. सर्वांच्या सहमतीने श्री वेताळ पत्रकार संघाच्या नुतन अध्यक्षपदी प्रा.संतोष लोकरे सर यांचे नाव पत्रकार अभिषेक पवार यांनी सुचविले. त्यास संभाजी वागज सर व परबत यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सर्वांच्या सहमतीने उपाध्यक्षपदी संतोष पांढरे यांची निवड करण्यात आली. तर सर्वांच्या सहमतीने सचिवपदी विजयकुमार खिलबुडे यांची निवड करण्यात आली. तसेच सहसचिवपदी बालाजी वाघ यांची तर खजिनदार पदी संभाजी वागज यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर सर्व नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर नुतन पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करीत वर्षभरातील नियोजित कामाचा लेखाजोखा मांडला. यावेळी आलेल्या प्रत्येक पत्रकार बांधवांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. व आभार पत्रकार अभिषेक पवार यांनी मानले. त्यानंतर सर्वांसाठी अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती.अशा रितीने आजची श्री वेताळ पत्रकार संघ मोडनिंब ची मिटींग खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
यावेळी नुतन अध्यक्ष प्रा.संतोष लोकरे सर, उपाध्यक्ष संतोष पांढरे, सचिव विजयकुमार खिलबुडे,सहसचिव बालाजी वाघ, खजिनदार संभाजी वागज,अरुण काका सुर्वे, विजयकुमार परबत, सतीश निंबाळकर सर, साईदास चव्हाण, समीर मुलाणी, अभिषेक पवार, गोविंद मस्के, अक्षय खंदारे हे पत्रकार बांधव उपस्थित होते.





