मुख्य संपादक : संतोष पांढरे(मोडनिंब)
मोडनिंब (ता.माढा) येथील बहुचर्चित अशा जलजीवन मिशन योजनेच्या रखडलेल्या कामासंदर्भात मोडनिंब येथील वेताळ परिवाराने १९ मेपासून ठिय्या आंदोलन सुरू केले होते.
या आंदोलनात प्रकाश गिड्डे, कैलाश तोडकरी,प्रशांत गिड्डे,शिवाजी सुर्वे,सरपंच प्रतिनिधी राहुल पाटील, उपसरपंच अमित कोळी,ग्रा. पं सदस्य बालाजी पाटील,संजीव शिंदे,हनुमंत कुंभार, अनिल शिंदे, ऋषिकेश कोठावळे, धनाजी लादे,सुरेश जाडकर, राजेश निंबाळकर, अॅड. गणेश सुर्वे, दीपक सुर्वे,शंकर कोठावळे, जयवंत ओहोळ, चंद्रकांत गिड्डे,उदय जाधव, सुनील सुर्वे,अमोल गिड्डे, बंडू तोडकरी यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, माजी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, दिपक सुर्वे यांच्यासह विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी आंदोलनास पाठिंबा दिला. आंदोलनस्थळी झालेल्या भाषणांतून जलजीवन मिशनचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. आंदोलनाच्या दरम्यान मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, माजी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, दिपक सुर्वे आदींनी ठामपणे पाण्याच्या कामाची मागणी केली होती. आंदोलनस्थळी जलजीवन प्राधिकरणाचे उपअभियंता गुणवंत करळे, कोष्टी यांनी भेट देत चर्चा केली होती. शिष्टमंडळाशी चर्चा करुन आंदोलन थांबवावे, अशी विनंती त्यांनी केली. दरम्यान,उपविभागीय अभियंता गुणवंत कराळे व सोलापूरचे कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील यांच्या उपस्थितीत सविस्तर बैठक झाली.या बैठकीत रखडलेल्या योजनेच्या अडचणींवर चर्चा झाली. त्यानंतर बुधवारी प्रशासनाने काम सुरू करण्याबाबत लेखी आश्वासन दिले.सदरील कामाबाबत सविस्तर चर्चा झालेली असून मोडनिंब येथील मुख्य संतुलन टाकीचे (एम.बी.आर.) काम १५ दिवसात सुरू करण्याचे चर्चेअंती ठरले असून,त्याप्रमाणे या खात्यामार्फत सदरमोडनिंब येथील मुख्य संतुलन टाकीचे (एम.बी.आर.) काम १५ दिवसात आवश्यक ते नियोजन करून सुरू करण्यात येईल, असे उप-विभागीय अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उप विभाग बार्शी यांनी निवेदनात म्हटले आहे.पाईपलाईन, -जलशुद्धीकरण केंद्र की मुख्य टाकी? या प्रश्नात प्रशासन सध्या अडकले आहे. तिन्ही घटक परस्परपूरक असले तरी एकाच वेळी सर्व कामांना हात घालणे शक्य नसल्यामुळे अधिकारी संभ्रमात आहेत.वाढीव प्रस्तावानुसार सुमारे १५ कोटी ५० लाखाची मोडनिंब साठी असलेली योजना प्रति मानसी 55 लि पाणी ; तरी गाव पातळीवर सर्वांनी समन्वय साधून ही योजना लवकर पूर्ण कशी होईल याबाबत काळजी घेणे महत्त्वाचे आहे.असे मत राष्ट्रवादी चे नेते उदय माने यांनी व्यक्त केले.शिवाजी सुर्वे(ग्रा.पं सदस्य) यांची डी पी आर चुकीचा असून वाड्या-वस्त्यांचा समावेश असलेली सुधारित योजनेची मंजुरीच्या अंदाजपत्रकाची पत्र मिळावी अशी स्पष्ट भूमिका/मागणी मांडली.पाण्यासाठी वंचित राहिलेल्या मोडनिंब साठी ठिय्या आंदोलनात अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळे आम्ही आंदोलन मागे घेतले आहे.मात्र त्यात दिरंगाई झाल्यास पुढील आंदोलन हे सोलापूर मध्ये करू असे ही वेताळ परिवार अध्यक्ष प्रकाश गिड्डे यांनी आंदोलन मागे घेताना स्पष्ट केले आहे.



