मुख्य संपादक : संतोष पांढरे(मोडनिंब)
सध्याच्या काळामध्ये गावामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच गावात शांतता प्रस्थापित करणे तसेच गावाची सुरक्षा अबाधित ठेवणे याकरिता प्रत्येक गावात ग्रामपंचायतने पंचसुत्री उपक्रम राबवणे आवश्यक आहे. शरीरा विरुद्धचे गुन्हे व मालमत्तेचे गुन्हे कमी करणे त्यावर प्रतिबंध करणे हे मुख्य काम वरील पंचसूत्री कार्यक्रमाने करता येईल.त्यासाठी प्रत्येक गावात सरपंचाने तसेच सर्व सदस्याने पोलीस पाटलांनी आणि तंटामुक्तीचे अध्यक्ष व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांनी पुढाकार घेऊन खालील पंचसूत्री उपक्रम राबवणे आवश्यक आहे
●तंटामुक्त समिती स्थापन करून ती कार्यान्वित करणे.
●ग्राम सुरक्षा यंत्रणा चालू ठेवणे.
●गावात ग्राम सुरक्षा दल स्थापन करणे व ते ऍक्टिव्ह ठेवणे.
●गावामध्ये महिला सुरक्षा समिती स्थापन करणे व ऍक्टिव्ह ठेवणे.
●ग्रामपंचायतने गावात सीसीटीव्ही कॅमेरे चौका चौकात बसवणे.
वरील पंचसूत्री उपक्रम राबवण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक पवार साहेबांनी सर्व ग्रामपंचायतला केले आहे.


