पुणे प्रतिनिधी : रवींद्र मोडक
11 मे 2025 रोजी व्हिएतनाम येथे पार पडलेली आर्यनमॅन 70.3 ही आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धा यंदा विशेष ठरली. ५० देशांतील तब्बल २५०० स्पर्धक या अत्यंत कठीण स्पर्धेत सहभागी झाले होते. या आव्हानात्मक स्पर्धेत खराडी (पुणे) येथील सतिश चंद्रकांत पठारे यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि फिटनेसच्या जोरावर ठसा उमटवला.या स्पर्धेत १.९ किमी पोहणे, ९० किमी सायकलिंग आणि २१.१ किमी धावणे अशा एकूण ११३ किमी अंतराची ट्रायथलॉन पूर्ण करण्यासाठी ८ तास ३० मिनिटांची मर्यादा होती. हे आव्हान पार करताना पठारे यांनी केवळ ७ तास ४१ मिनिटे आणि ३५ सेकंद इतक्या अल्प वेळेत ही स्पर्धा पूर्ण केली. यंदाच्या स्पर्धेत फक्त ६२५ स्पर्धकांनी हे आव्हान यशस्वीरित्या पूर्ण केलं असून, त्यात पठारे यांचा समावेश अत्यंत अभिमानास्पद ठरतो.या यशामागे गेल्या वर्षभराची सातत्यपूर्ण मेहनत आहे, असे सांगताना पठारे म्हणाले,"ही स्पर्धा पूर्ण करणे हे माझे स्वप्न होते. खराडी आणि पुणेकर नागरिकांसाठी ही स्पर्धा पूर्ण करणे हेच माझे ध्येय होते, आणि ते पूर्ण झाल्याचा मला अतिशय आनंद आहे."पुढील स्पर्धांमध्ये आणखी उत्तम कामगिरी करत माझ्या खराडी गावाचे, पुण्याचे आणि महाराष्ट्राचे नाव उज्वल करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला."येत्या काळात मी नव्या पिढीला मार्गदर्शन करून त्यांना अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयार करणार आहे," असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
सतीश चंद्रकांत पठारे"स्वप्न, जिद्द आणि सातत्य – यांच्यावर विश्वास ठेवला, आणि आज हे यश पदरात पडलं..."
स्पर्धा पूर्ण करणे हे माझं बालपणापासूनचं स्वप्न होतं. खराडी आणि पुणेकर नागरिकांसाठी ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करणे हेच माझं ध्येय होतं... आणि ते पूर्ण झाल्याचा मला अतिशय आनंद आहे.
पुढील स्पर्धांमध्ये आणखी उत्कृष्ट कामगिरी करत मी माझ्या खराडी गावाचे, पुण्याचे आणि महाराष्ट्राचे नाव उज्वल करणार आहे. येत्या काळात नव्या पिढीला मार्गदर्शन करून त्यांना अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयार करणार आहे, असा माझा निश्चय आहे.
या यशामागे ज्यांचा मोलाचा हात आहे ते म्हणजे…
कोच (गुरुवर्य): चैतन्य वेल्हाळ — यांचे प्रगल्भ मार्गदर्शन मला नेहमीच प्रेरणा देत राहिले
आई: श्रीमती सुमन पठारे — त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नव्हते
भाऊ: विलास पठारे व संतोष पठारे.यांचे सततचे प्रोत्साहन
पत्नी: पूनम पठारे — संकटसमयी धैर्य देणारी माझी साथ
मुलगी: आणि मुलगा: आर्या पठारे व अर्णव पठारे — यांचे प्रेम व साथ
सहकारी मित्र: पप्पू सस्ते — प्रत्येक प्रॅक्टिस सत्रात खांद्याला खांदा लावून साथ दिली
मार्गदर्शक: मा.आमदार बाप्पूसाहेब पठारे व अण्णासाहेब पठारे— यांचे सदैव बहुमूल्य आशीर्वाद
वडील: स्व. चंद्रकांत पठारे त्यांच्या आठवणी आणि आशीर्वाद मला नवी ऊर्जा देत राहतात.
खराडी: गावकऱ्यांचे प्रेम, पाठिंबा आणि प्रेरणा हेच माझं खऱ्या अर्थाने बळ आहे
"या सर्वांच्या पाठबळामुळेच आज मी हे शक्य करून दाखवू शकलो. हे यश माझं नसून, माझ्या सर्वांचे आहे… आणि हे मी माझ्या स्वर्गीय वडिलांन चंद्रकांत पठारे यांना समर्पित करतो.
"स्वप्न, जिद्द आणि सातत्य – यांच्यावर विश्वास ठेवला, आणि आज हे यश पदरात पडलं..."
स्पर्धा पूर्ण करणे हे माझं बालपणापासूनचं स्वप्न होतं. खराडी आणि पुणेकर नागरिकांसाठी ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करणे हेच माझं ध्येय होतं... आणि ते पूर्ण झाल्याचा मला अतिशय आनंद आहे.
पुढील स्पर्धांमध्ये आणखी उत्कृष्ट कामगिरी करत मी माझ्या खराडी गावाचे, पुण्याचे आणि महाराष्ट्राचे नाव उज्वल करणार आहे. येत्या काळात नव्या पिढीला मार्गदर्शन करून त्यांना अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयार करणार आहे, असा माझा निश्चय आहे.




