अमरावती प्रतिनिधी -
दि.17/5/2025 भारतीय बौद्ध महासभा विधी संस्कार संचालक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन आचलभूमी बिहाली, अमरावती येथे तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रशिक्षण शिबिरास मार्गदर्शन करताना डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब म्हणाले की ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला धम्म हेतू साध्य करा ,यावेळी मार्गदर्शक भंते सुनीतीजी ,भंते विजया मैत्रीय, व संघ यानी अनमोल मार्गदर्शन करताना बौद्धांचे 13 संस्कार विधी व विनय पीठक मधील निदान, महामंगलसुत ,परितसुत, करणी मेतसुत, पराभवसूत याविषयी सविस्तर माहिती देऊन धम्माचे अनमोल मार्गदर्शन केले. या शिबिरासाठी सोलापूर ,माढा, कुर्डूवाडी अमरावती, वर्धा अकोला, वाशिम, बुलढाणा, नंदुरबार वर्धा ,गोंदिया, गडचिरोली ,ठाणे या ठिकाणाहून ८६ प्रशिक्षणार्थी यांनी सहभाग नोंदवला. प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.राजरत्न आंबेडकर साहेब यांनी उपस्थित राहून सर्वांना सन्मानपत्र ओळखपत्र बहाल केले व प्रशिक्षणार्थीचा प्रश्न उत्तरांचा पाठपुरावा व आढावा घेण्यात आला यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. राजरत्न आंबेडकर म्हणाले की, विधी हा एक सारखाच असावा त्यामध्ये एक सूत्रता हवी. विधी व निधी यापुरते मर्यादित न राहता विधीतील गाथेचा ,सुताचा अर्थ मराठीत समजावून सांगणे महत्त्वाचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला धम्माचा हेतू तो पूर्ण केला पाहिजे. कोणी कितीही मोठा असला तरी आपले स्वातंत्र्य घाण ठेवू नये. शिबिर एक पाठ असून भारत बौद्धमय करण्याचा हेतू घेऊन पुढे गेले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.
या शिबिरासाठी अरुणाताई इंगळे, रविकांत जाधव, रवींद्र कांबळे सुनील चांदणे ,अण्णाराव खंडागळे, सावताहरी कांबळे, अक्षय विद्यागज, डॉ.दयानंद सोनवणे, विठ्ठल सरवदे, अक्षय सोनटक्के हरी सरवदे. व राज्य जिल्ह्याचे पदाधिकारी शिबिरार्थी उपस्थित होते.



