Breaking

Tuesday, May 20, 2025

सासवड शहराला 8.5 कोटींची विकास कामे – भूमिपूजन समारंभ उत्साहात संपन्न


पुणे प्रतिनिधी : रवींद्र मोडक

दि.19 मे 2025 मुख्यमंत्री नगरपरिषदांना विशेष निधी योजनेअंतर्गत सासवड शहरासाठी 8.5 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी मिळाली असून, ही कामे राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ भाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुरंदर-हवेलीचे कार्यसम्राट आमदार मा. श्री. विजय बापू शिवतारे यांच्या अथक प्रयत्नातून मंजूर करण्यात आली आहेत.या विकास कामांपैकी काही प्रकल्पांचे भूमिपूजन समारंभ नेताजी चौक, बोरावके आळी, जय बजरंग तालीम व जुना भैरोबा मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे भूमिपूजन डॉ. सौ. ममताताई लांडे-शिवतारे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.या वेळी तालुकाप्रमुख श्री. हरिभाऊ लोळे, मा. उपनगराध्यक्ष श्री. दीपक नाना टकले, मा. नगरसेवक डॉ. राजेश दळवी, तसेच श्री. सचिनदादा भोंगळे, श्री. अरुण आप्पा जगताप, श्री. सागर आबा जगताप, अतुल जगताप, राजुशेठ टकले, राजुशेठ शिंदे, धनंजय म्हेत्रे, नरेंद्र झगडे, संगीता माने, चंदूकाका जगताप, अजित चौखंडे, रुपेश वढणे, अंकुर शिवरकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या विकास कामांमुळे सासवड शहराचा चेहरामोहरा बदलून अधिक आधुनिक, सुव्यवस्थित व नागरिकस्नेही होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.