मुख्य संपादक : संतोष पांढरे(मोडनिंब)
महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माढा तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता अरण येथील समूल फार्मर प्रोड्यूसर कंपनीला भेट देऊन कंपनीच्या विविध प्रोडक्ट्स बद्दल माहीती जाणून घेतली.व कंपनीचे संस्थापक अध्यक्ष बालाजी बबन गाडेकर व सौ. वैशाली बालाजी गाडेकर यांचे कौतुक केले.
यावेळी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले 10 कोटी रु खर्च करून बालाजी गाडेकर यांनी उभारलेला प्रकल्प हा केवळ त्यांची धडपड व प्रबळ इच्छा शक्ती मुळे शक्य झाला आहे.प्रकल्प पूर्ण होत नाही आणि जो पर्यंत या भागातील शेतकऱ्यांचा माल परदेशात जात नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही असा त्यांचा सुरवातीपासूनचा असलेला निश्चयआहे,अजूनही ते पायात चप्पल घालत नाहीत.शेतकऱ्यांसाठी व शेतकऱ्यांच्या कंपनीसाठी असा निश्चय करणारा महाराष्ट्रातील पहिला अवलिया बालाजी गाडेकर मी पाहीला.तसेच आश्वासक अशी शेती तयार करण्यासाठी असलेला त्यांचा पुढाकार ह्या गोष्टींचा आवर्जून सुरवातीलाच मा.कृषीमंत्री कोकाटे यांनी उल्लेख केला.
मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प(स्मार्ट) या योजनेतून त्यांना अनुदान मिळाले आहे.आमच्या स्मार्ट अधिकाऱ्यांनी त्यांना मोठया प्रमाणात मदत केली आहे.आणि यानंतर च्या काळात हायजीन कसे मेन्टेन करता येईल आणि प्रत्यक्षात प्रोजेक्ट कसा लवकर सुरू करता येईल.याकरिता त्यांचा टेक्निकल स्टाफ, शेतकरी सभासद,स्वतः ते व सहकारी निश्चित प्रयत्न करतील .या जिल्ह्यात जवळ पास 40-50 प्रकल्प प्रगती पथावर आहेत.शाश्वत शेती चा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल.असे ही ते म्हणाले.सरकारने आणलेल्या योजनांचा पुरेपूर फायदा शेतकरी सध्या घेत आहेत याचा मला आनंद होतोय व ही एक समाधानाची बाब आहे.भविष्य काळ ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा खूपच चांगला असेल त्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करील.अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.एक मॉडेल म्हणून महाराष्ट्र मधील अनेक शेतकरी या प्रकल्पास भेट देतील.आणि स्वतः ते प्रॉडक्टचे यश पाहतील आणि ते ही ह्या प्रोजेक्ट साठी पुढाकार घेतील.स्मार्ट प्रकल्प साठी आपण शासनाकडे प्रस्ताव ही पाठवू. शेतकऱ्यांच्या मालकी चे असे प्रोसेसिंग प्लॅन्ट झाले की फार मोठं काम शासनाला उभे करता येईल.त्यासाठी मग लागेल ती मदत शासनास देता येऊ शकेल.सोलापूर जिल्हा हा कार्यक्षम, प्रगतीशील जिल्हा असून येथील शेतकरी ही प्रगती शील व प्रयोगशील आहेत.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सरतेशेवटी जाणीवपूर्वक प्रकल्पाला सदिच्छा भेट देऊन मला मनापासून आनंद होत आहे व त्यांनी फार्मर प्रोड्युसर कंपनीला शुभेच्छा देते वेळी संस्थापक अध्यक्ष श्री बालाजी बबन गाडेकर व सौ वैशाली बालाजी गाडेकर उपस्थित डायरेक्टर सुषमा नागनाथ कोल्हाळे, हिमानी पांडुरंग कातकर, कीर्ती धनाजी साठे, देविदास सोपान काळे,उमाजी निवृत्ती देवकर, मोहन बलभीम भोसले, दीपक हरिभाऊ जाधव,संकेत बाळासो नाईकवडे,अरविंद सावंत,मा.समाज कल्याण चे सभापती शिवाजीराजे कांबळे,जि.प.सदस्य भारत आबा शिंदे, राष्ट्रवादी चे नेते उदय माने,मा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, मा .प्रकल्प संचालक आत्मा डॉ.कांताप्पा खोत नोडल अधिकारी जिल्हा अंमलबजावणी कक्ष स्मार्ट प्रकल्प अश्विनी कुंभार उपविभागीय कृषी अधिकारी कुर्डूवाडी श्री वाकोडे सर तालुका कृषी अधिकारी माढा चंदन साहेब व सर्व कृषी अधिकारी व सर्व शेतकरी उपस्थित होते.शेतकऱ्यांच्या शेतमालाला वर्षभरात जो पर्यंत योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत प्रक्रिया करून शेतमाल कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवता येईल.असे संस्थापक अध्यक्ष बालाजी गाडेकर यांनी स्पष्ट केले.