पुणे प्रतिनिधी : रवींद्र मोडक
मुख्य संपादक : संतोष पांढरे
उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी दिनांक, 25 मे 2025 रोजी पुण्यात कौटुंबिक अत्याचाराचा बळी ठरलेल्या वैष्णवी कस्पटे-हागवणे हिच्या आई-वडिलांची तसेच संपूर्ण कस्पटे कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शोकाकुल कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांच्या भावना समजून घेतल्या व न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली.वैष्णवी हिला हुंड्यासाठी हागवणे कुटुंबीयांनी छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असून, या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित आरोपींना अटक केली आहे.या भेटीत मा. शिंदे साहेबांनी कस्पटे कुटुंबियांचे म्हणणे सविस्तर ऐकून घेतले आणि “दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल,” असे स्पष्ट शब्दांत सांगितले.
त्यांनी वैष्णवीच्या लहानग्या बाळाला उचलून त्याच्या उज्वल भविष्यासाठी सरकारच्या वतीने आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, असा विश्वासही दिला.यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे,मा मंत्री, आमदार विजयबापू शिवतारे तसेच समस्त कस्पटे कुटुंबीय उपस्थित होते.



