मुख्य संपादक : संतोष पांढरे (बारामती)
यशवंतराव होळकर प्रतिष्ठान तर्फे आयोजित अहिल्यादेवी होळकर 300 वी जयंती प्रसंगी प्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
तसेच भव्य दिव्य मिरवणूक उरुळी कांचन शहरातून काढण्यात आली.
सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव प्रतिष्ठान, समस्त समाज बांधव व समस्त ग्रामस्थ उरुळी कांचन पंचक्रोशी यांनी केले होते.पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शब्द जादुगार महाराष्ट्राचे युवा वक्ते प्रा.डॉ. सुनिल धनगर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सांजप्रबोधन व्याख्यानमाला या कार्यक्रमात
"महापुरुषांच्या विचारांचे आचरण व आधुनिक समाजातील स्त्रीशक्तीचे योगदान" या विषयावर चिंतन कार्यक्रमात प्रमुख वक्त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांचे कर्तृत्व, समाजसेवा, न्यायप्रियता आणि प्रजासत्ताक धोरणे यांचा मागोवा घेतला. त्यांनी महापुरुषांचे विचार केवळ स्मरणात ठेवण्याऐवजी आचरणात आणले पाहिजेत, यावर विशेष भर दिला.स्त्रीशक्ती या विषयावर बोलताना वक्त्यांनी आजच्या काळात महिलांनी विविध क्षेत्रात केलेली प्रगती, नेतृत्व व सामाजिक योगदान अधोरेखित केले.अहिल्यादेवींप्रमाणेच आजही महिलांनी आत्मनिर्भरतेच्या दिशेने पुढे जात समाज परिवर्तनात सक्रिय भूमिका निभावावी, असे आवाहन प्रा.डॉ. सुनील धनगर यांनी केले. अहिल्यादेवींनीही शिक्षण प्रसारासाठी योगदान दिले होत.समाज विकासासाठी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना वक्त्यांनी सांगितले की, प्रत्येक व्यक्तीने शिक्षणाची कास धरून स्वतःचा सर्वांगीण विकास साधावा. शिक्षण हे समाज सुधारण्याचे सर्वोत्तम साधन आहे.कार्यक्रमात स्वतःचा विकास करून समाजऋण फेडण्याची जबाबदारी प्रत्येक सुजाण नागरिकावर आहे, हे ठसवले गेले. कर्तव्यनिष्ठा, सेवाभाव, आणि आत्मविकास या त्रिसूत्रीचा आदर्श समाजात रुजवण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
यशवंतराव होळकर प्रतिष्ठान तर्फे आयोजित अहिल्यादेवी होळकर 300 वी जयंती भव्य दिव्य होण्यासाठी अप्पासाहेब वाघमोडे, बळीरामजी दुबे, प्रा.अजय गाढवे, सिद्धेश्वर यमगर, बापूसाहेब करे, बाळासाहेब मदने, मारुती कोकाटे, राहुल आगलावे, सागर आगलावे, दिलीप गाडेकर, नवनाथ मासाळ, बाबासाहेब गायकवाड, बाबुराव मदने, शिंगुदेव खताळ तसेच मित्र मंडळी यांचे लाख मोलाचे सहकार्य लाभले. या जयंतीस उरळीकांचन तथा पंचकृषीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मान्यवर, महिला प्रतिनिधी, मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांना समर्पित संकल्प घोषणेने करण्यात आली.





