मुख्य संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब)
पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुरवठा होणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करणे आवश्यक असताना वैराग शहरास आजतागायत शुद्ध पाणीपुरवठा नगरपंचायतीने केलेला नाही. वैराग शहरास अशुद्ध पाणी पुरवठा होत असलेबाबतच्या अनेक तक्रारी आपले कार्यालयाकडे असलेल्या असतानाही आजतागायत शुध्दी करणं प्रकिया करून पाणी पुरवठा केला जात नाही.वैराग शहरास स्वच्छ व नियमित पाणी पुरवठा केला जातो का नाही याची तपासणी स्टिंग ऑपरेशन करून प्रत्येक वार्डातील नागरिकांच्या कमीत कमी 10 ते 15 जणांच्या घरी जावून या पाण्याची तपासणी करावी व त्यांनाच विचारणा करून खात्री करावी किती दिवस झाले पाणी अस्वच्छ येत आहे याची; आजतागायत कधीच वैराग शहरात स्वच्छ पाणी मिळालेले नाही.
यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो तसेच हया बाबतीत हयगय झाल्या संबधी योग्य ती कारवाई ही व्हावी असे निवेदन ऋषिकेश दिंडोरे (वैराग)यांनी दिले मा. जिल्हाधिकारी साहेबांना दिले आहे. आणि समस्त वैरागवासी स्वच्छ पाणी पुरवठे ची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे त्वरित ह्यावर कायमस्वरूपी तोडगा मा.जिल्हाधिकारी साहेबांनी काढावा अशी समस्त जनतेतून मागणी होत आहे.



