Breaking

Thursday, June 19, 2025

म.न.वि.से च्या वतीने मोडनिंब व पंचक्रोशीतील शाळांच्या मुख्याध्यापकांना राजसाहेब ठाकरे यांचे सुचना पत्राचे वाटप


मुख्य संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब)                          

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मोडनिंब व पंचक्रोशीतील शाळांच्या मुख्याध्यापकांना मा.राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्य सरकार ने हिंदी भाषेची सक्ती केली आहे याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विरोध आहे यांच अनुषंगाने महाराष्ट्रातील मुख्याध्यापकांना ही राजसाहेब ठाकरे यांनी पत्र लिहून काही सुचना केल्या आहेत.

याच‌ पत्राचे वाटप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सोलापूर जिल्हाअध्यक्ष राहुलराज सुर्वे व मोडनिंब शहराध्यक्ष विठ्ठल गिड्डे , रामभाऊ माळी , सतीश शिंदे , निलेश नलवडे ई. उपस्थित होते.

महाराष्ट्रात या भाषा लादण्याच्या प्रकरणाबाबत प्रचंड असंतोष आहे. मुले मोठी झाल्यावर त्यांच्या गरजेनुसार त्यांना हवी ती भाषा ते शिकू शकतात, मग आत्तापासूनच हे ओझे कशाला? हिंदी ही राष्ट्रभाषा नाही,असलीच तर राज्यभाषा आहे. तिसरी भाषाच हिंदी मुलांना शिकायची नाहीये तर मग पुस्तक छपाई का सुरू आहे..?लेखी आदेश सरकार काढतील  किंवा न काढतील,पण आम्ही मदत करणाऱ्यांना आम्ही 'महाराष्ट्र द्रोहच' समजू हे नक्की.असे या पत्राद्वारे राजसाहेब ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.