Breaking

Tuesday, June 10, 2025

प्रकाश बापूराव घोगरे (पाटील)यांना गरुड फाउंडेशन यांच्या वतीने व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती "राज्यस्तरीय समाजभूषण" पुरस्कार


मुख्य संपादक : संतोष पांढरे(बारामती)

प्रकाश बापूराव घोगरे (पाटील)यांना सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ठ कार्याबद्दल नामांकित गरुड फाउंडेशन महाराष्ट्र व युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र यांच्या वतीने नुकताच आदर्श व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती राज्यस्तरीय पुरस्कार सन्मानित "समाजभूषण" दि.७ जुन २०२५ रोजी दिमाखदार सोहळ्यात मोठ्या सन्मानाने देण्यात आला .

महाराष्ट्रातील वैद्यकीय, प्रशासकीय, सहकार, सांस्कृतिक, सामाजिक,शैक्षणिक, उद्योग, कृषी, पत्रकारिता, आरोग्य, पर्यावरण, क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय व समाज हिताचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्रातील नामांकित पुरस्कारांपैकी समजला जाणारा पुरस्कार दिला जातो. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे अण्णासाहेब शिंदे सभागृह येथे अहिल्यानगरचे खासदार निलेशजी लंके, माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे, रावसाहेब खेवरे, पोलीस आयुक्त संदीप भांड, तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, रमेश खेमनर, पत्रकार जावेद शेख यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.प्रकाश पाटील यांचे शहरी व ग्रामीण भागात सामाजिक व पर्यावरण क्षेत्रात भरीव योगदान आहे नागरिकांना व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती  मार्गदर्शन करण्याचे काम करत आहे.

लोकांचे व्यसन सुटण्यासाठी त्यांचे "उत्कृष्ट" प्रकारचे काम पाहून त्यांना राज्यस्तरीय "समाजभूषण" पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल खा निलेशजी लंके व मा. राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांनी अभिनंदन केले तसेच विविध राजकीय सामाजिक स्तरातून प्रकाश घोगरे (पाटील) यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.