Breaking

Friday, June 13, 2025

उदय कीर्ती अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.लऊळ शाखेचा सोमवारी उद्घाटन सोहळा


मुख्य संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब)                             

उदय कीर्ती अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या लऊळ शाखेचे उद्घाटन सोमवार (दि.१६) रोजी मोहोळ विधानसभेचे मा.आमदार यशवंत(तात्या) माने यांच्या हस्ते व रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुहास पाटील यांच्या अध्यक्षते खाली होणार आहे, अशी माहिती बँकेचे चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नेते उदय माने यांनी दिली.

श्री संत शिरोमणी सावता महाराजांचे वंशज ह.भ.प रमेश महाराज वसेकर,लऊळचे दत्त महाराज,उपासक संतोष महाराज देवकर, सरपंच पवन भोंग, उपसरपंच गोरख गवळी,माजी उपसभापती प्रतापराव नलवडे,मा. सरपंच प्रियांका कांबळे,मा.उपसरपंच संजय लोकरे,मोहन काका नलवडे,कापड उद्योजक बंडू नलवडे,मा.पंचायत समिती सदस्य प्रभाकर भोंग,गणेश नलवडे,व ग्रामपंचायत सदस्यांसह इतर मान्यवर ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा उदघाटन सोहळा होणार आहे.लऊळ येथे उदय कीर्ती अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीची पहिली शाखा सुरू होत आहे. संस्थेचे सभासद २ हजार ८९९ आहेत. संस्थेचा मिश्र व्यवसाय ९ कोटी रुपये आहे. भाग भांडवल ८१ लाख आहे. आत्तापर्यंत संस्था ठेवी ६.५० कोटी पर्यंत आहेत. २.५० कोटी पर्यंत कर्जवाटप केले आहे,अशी माहिती व्हाईस चेअरमन आकाश उदय माने व  मुख्य शाखाधिकारी साईप्रसाद काळे(मोडनिंब शाखा) यांनी दिली.तसेच 50,000 ते 2 लाखापर्यंत   गरजूंना कर्ज लागलीच व सहज उपलब्ध करून दिले जाईल आणि आकर्षक ठेवीवरती सर्वाधिक व्याजदर देणारी एकमेव अशी आमची बँक असल्याचे ही चेअरमन उदय माने यांनी नमूद केले.आणि या निमित्त आयोजित सत्यनारायण महापूजेस  व तिर्थप्रसादास पंचक्रोशीतील  सर्वांनी उपस्थित राहण्याची विनंती ही त्यांनी केली आहे.

उदय (दादा) माने हे नामांकित उद्योगपती असून उदयकीर्ती अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी चे चेअरमन असून एक हसरे लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहे ,सध्या अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष साठी  त्यांचे नाव ही सर्वत्र चर्चेत आहे.