Breaking

Saturday, June 7, 2025

सासवड आगारात नवीन एस.टी. बसेसचा लोकार्पण सोहळा माजी मंत्री,विद्यमान आमदार विजय बापू शिवतारे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न


ग्रामीण प्रवाशांसाठी प्रवास होणार अधिक सोयीस्कर व सुरक्षित 

पुणे प्रतिनिधी : रविंद्र मोडक

दिनांक : 6 जून 2025 रोजी पुरंदर-हवेली मतदारसंघातील प्रवाश्यांच्या सोयीसाठी नवीन एस.टी. बसेस सासवड आगारात दाखल झाल्या असून, 6 जून रोजी या बससेवेचे लोकार्पण  माजी मंत्री,विद्यमान आमदार विजय बापू शिवतारे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.

या नव्या बससेवेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रवास अधिक वेळेवर, सुरक्षित आणि सुसंवादात्मक होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, तसेच नोकरदार व प्रवासी वर्गाला दैनंदिन प्रवासात मोठा दिलासा मिळणार आहे.

या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी माजी आमदार अशोकराव टेकवडे, हरिभाऊ लोळे, शेखर वढने, राजुशेठ झेंडे, सचिन भोंगळे, राजेश दळवी, वैशाली काळे, विद्या टिळेकर, मंगेश भिंताडे, अंकुर शिवरकर, नारायण खळदकर, नितिन पोटे, विक्रांत पवार, रामदास मेमाणे, दादा मारणे, आदेश यादव, सागर गाडे, महेश भोंगळे, तसेच सासवड आगाराचे अधिकारी व कर्मचारी, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वांनी एकत्र येत हा लोकार्पण सोहळा उत्साहात साजरा केला आणि येत्या काळात प्रवाश्यांच्या सुविधेसाठी अजूनही उपयुक्त सेवा सुरू करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.