मुख्य संपादक : संतोष पांढरे(मोडनिंब)
कानेगाव (ता. लोहारा) येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मोफत नेत्र तपासणी महाशिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात २१७ रूग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. राजमाता अहिल्यादेवी बहुउद्देशीय सामाजिक संस्था (कानेगांव, ता. लोहारा) यांच्यावतीने गुरुवारी (दि.१२) राजमाता अहिल्यादेवी सभागृहात हे शिबिर घेण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोहारा पंचायत समितीचे माजी सभापती बळीराम लव्हळे होते. तहसिलदार रणजितसिंह कोळेकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.तर पोलीस निरीक्षक मा.श्री.ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी ॲड. श्रीकृष्ण सोलंनकर, डॉ. हेमंत श्रीगीरे, ,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत आडसुळे, सचिव उषाताई अडसुळे (शेंडगे )कानेगावचे सरपंच नामदेव लोंभे, यांची प्रमुख उपस्थिती होती.सायली आय स्पेशालिस्ट, धाराशिवच्या नेत्रतज्ज्ञांनी या शिबिरात नेत्र तपासणी केली. महाशिबिराचा कानेगावसह पंचक्रोशीतील नागरिकांनी लाभ घेतला. कार्यक्रमासाठी ह.भ.प.पंडित महाराज,ॲड.सत्यवान आडसुळे ,राघवेंद्र गावडे,धिरज कदम,जलिंदर सोनटकके, डॉ.समाधान शिंदे, श्री रघुविर घोडके , श्री . सुरेश वाघमोडे शुभम महानवर, सनातन भालकडे, लिंबराज क्षिरसागर,संताराम क्षिरसागर, धनराज घोडके उमरगा श्री . त्र्यबंक कदम , भीमराव घोडके , व्यंकट लव्हळे , पांडूरंग लोभे , परमेश्वर चंदनशिवे , रावण क्षिरसागर , मारुती सोनटकके , दयानंद अडसुळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुत्र संचालन श्री प्रशांत अडसुळे यांनी केले.प्रास्ताविक श्री .सत्यवान अडसुळे यांनी तरआभार श्री.महेश अडसुळे यांनी मांडले .




