मावळ प्रतिनिधी : मंगेश आखाडे
मुख्य संपादक - संतोष पांढरे(बारामती)
दि.१४ शनिवार रोजी कान्हे येथील साई सेवाधाम येथे हा गुणगौरव सोहळा करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन साठी व्याख्याते म्हणून डॉ.संदीप कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी सुद्धा त्यांचे अनुभव मांडले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक सुधाकर शेळके,अध्यक्ष मनसे मावळ तालुका अशोक कुटे,कामशेत सरपंच रुपेश गायकवाड,रा.कॉ.कामशेत शहर अध्यक्ष निलेश दाभाडे,मा.उपसरपंच दत्ता शिंदे,आर.पी.आय पुणे युवक अध्यक्ष समीर जाधव,कान्हे सरपंच विजय सातकर,भाजपा का.व.मा.मंडळ अभिमन्यू शिंदे,डॉ.विकेश मुथा,कामशेत पोलीस गणेश तावरे,जेष्ठ पत्रकार सुदेश गिरमे व जेष्ठ पत्रकार गणेश विनोदी आदी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच यावेळी कामशेत ग्रामीण पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.यामध्ये अध्यक्ष चेतन वाघमारे,उपाध्यक्ष सुभाष भोते,सचिव प्रफुल्ल ओव्हाळ,सहसचिव दक्ष काटकर,खजिनदार सागर शिंदे, पत्रकार परिषद प्रमुख शिवानंद कांबळे,सह पत्रकार परिषद प्रमुख सोपान येवले,सल्लागार सचिन शिंदे,राजेंद्र कांबळे,संघटक उत्तम ठाकर,सदस्य निलेश ठाकर,संकेत जगताप,अभिषेक बोडके,चंद्रकांत असवले,अतुल चोपडे,बाबुराव काळे,मंगेश आखाडे,रमेश शिंदे यांनी निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रफुल्ल ओव्हाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवानंद कांबळे यांनी केले यावेळी कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचे सर्व अधिकारी व सदस्य उपस्थित होते.




