Breaking

Monday, June 16, 2025

सर्व नगरपंचायत नगरपरिषद व नगरपालिका या कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी बायोमेट्रिक बसवणे व हालचाल रजिस्टर ठेवण्या संदर्भात ऋषिकेश दिंडोरे यांचे मा.सहआयुक्त यांना निवेदन


मुख्य संपादक : संतोष पांढरे(मोडनिंब)

जिल्ह्यातील आपल्या अखत्यारित असलेल्या सर्व कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक बसविणे गरजेचे आहे कारण या  कार्यालयातील अनेक अधिकारी व कर्मचारी हे सतत गैरहजर असतात तसेच त्यांना शासनाने  दिलेल्या अर्चित पगारी रजेपेक्षा त्याच्या रजा हया जास्त होतात तरी त्यांना हजर नसलेल्या दिवसाचे वेतन दिले जाते तसेच कार्यालयात अधिकारी व कर्मचारी हे वेळेवर येत नाहीत व कार्यालयाची वेळ संपायच्या अगोदर कार्यालयातून बाहेर पडतात त्यामुळे कार्यालयात बायोमेट्रिक बसवणे गरजेचे व आवश्यक आहे तसेच हालचाल रजिस्टर हे कार्यालयात पाहिजे कारण अधिकारी किंवा कर्मचारी हे कार्यालयाचे काम आहे असे सांगून दुसरीकडेच जात असतात किंवा गैरहजर राहतात तसेच ज्या कामासाठी गेलेले असतात ते काम झाल्यानंतरही कार्यालयामध्ये लवकर हजर राहत नाहीत किंवा कार्यालयात येत ही नाहीत त्यामुळे प्रत्येक कार्यालयात हालचाल रजिस्टर असावे अशी विनंती वजा निवेदन ऋषिकेश दिंडोरे यांनी सह आयुक्त,सोलापूर जिल्हा यांना दि.13/6/2925 रोजी दिले आहे.

या अगोदर ही दि.3/6/2025 रोजी वैराग नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणे बाबत निवेदन दिले होते त्यात त्यांनी कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना मिळणाऱ्या  वागणुकी बद्दल स्पष्ट उल्लेख केलेला होता.बऱ्याच कर्मचारी वर्गातील लोकांचा 3 वर्षा हुन अधिक काळ ह्या एकाच ठिकाणी झालेला असला तरी त्यांच्या बदल्या न झाल्याने समस्त नागरिक संभ्रमात पडले आहेत. सार्वजनिक सुविधांचा अभाव असूनही त्या दूर करायच्या सोडून वैराग येथील कर्मचारी तक्रारदारास हाकलुन व उसकावून लावतात त्यामुळे ऋषिकेश दिंडोरे यांनी तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्यांच्या तात्काळ बदल्या करण्यासाठी ही निवेदन देऊन अद्यापही त्यावर कोणतेही कारवाई झाली नाही. त्यामुळे वैराग मध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे. तरी बदली, बायोमेट्रिक,हालचाल रजिस्टर ह्या गोष्टींची मा. सहआयुक्त साहेबांनी दखल घ्यावी अशी सर्व वर्गांमधून प्रतिक्रिया येत आहे.