मुख्य संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब)
स्कूल चले हम...स्कूल चले हम
श्रीदत्त बहुउद्देशीय विकास मंडळ अरण, संचलित संजीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय एस. एस. प्राथमिक विद्यामंदिर व वसुंधरा इंग्लिश मीडियम स्कूल मोडनिंब या प्रशालेमध्ये 16 जून रोजी विद्यार्थी प्रवेशोत्सव 2025-26 आलेले नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत आनंददायी पद्धतीने टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले त्यावेळी पालक ही उपस्थित होते. प्रत्येक विद्यार्थ्यास गुलाब पुष्प व पाठ्यपुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.प्रशालेमधील आलेले सर्व नवीन विद्यार्थी यांचे स्वागत करण्यात आले आणि विद्यार्थ्यांचे तोंड गोड करण्यासाठी शिरा देण्यात आला. विद्यार्थ्यांनी तो दिवस आनंदात साजरा केला.
शाळा हे ज्ञानाचे मंदिर आहे, आणि प्रत्येक विद्यार्थ्याला ज्ञान देण्याची कार्य संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आपला आहार, आरोग्य,व्यायाम, झोप, अभ्यास याच पाच गोष्टी विषयी कानमंत्र दिला तसेच जास्त मोबाईल बघणार त्या विद्यार्थ्यांची कान उघडणी होणार असे कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी समाज कल्याण समिती सभापती जि.प.सोलापूर मा. श्री शिवाजी (नाना) कांबळे यांनी आपले विचार मांडले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव प्रकाश इंगळे, संचालक नागनाथ (अप्पा ) काळे, दिग्विजय कांबळे, आनंद सुर्वे, मारुती शिंदे, संजय शेळके,अमोल कोळी, रामभाऊ वाघमारे, प्राचार्य सुभाष रणदिवे सर, मुख्याध्यापक अमोल सरडे सर , सर्व शिक्षक,ग्रामस्थ , शिक्षणप्रेमी , पालक आदि उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सुभाष रणदिवे सर यांनी केले. प्रशालेतील सर्व नवागत बालके सकाळी लवकर उठून स्वच्छ सुंदर रंगीत कपडे घालून शाळेमध्ये आली होती. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता आणि जे विद्यार्थी शाळेत होते, प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी असणारी भावना व शाळेविषयी असणारी आवड ही दिसून येत होती.
संस्थेचे सचिव मा. प्रकाश (आबा)इंगळे यांनी नवीन शैक्षणिक वर्ष हे विद्यार्थ्यांना शालेय सर्वांगीण विकासाचे दृष्टीने यशदायी , आरोग्यसंपन्न व समाधानी जावो.ही सदिच्छा व्यक्त केली.व संस्थेतील सर्व कर्मचारी यांना नवीन शैक्षणिक कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरवसे मॅडम यांनी केले. व आभार पवार सर यांनी मानले.





