Breaking

Tuesday, June 17, 2025

मुलांनो नियमित शाळेत या;नियमित अभ्यास करा शाळेत घरी आनंदी राहून शिका म्हणजे अपेक्षित यश मिळेल : मिनाक्षीताई वाकडे



मुख्य संपादक - संतोष पांढरे (मोडनिंब)

प्रथम माय सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सात स्टॉल ची निर्मिती करण्यात आली होती. मान्यवर विद्यार्थी पालकांना प्रत्यक्ष एक वेगळाच अनुभव आला गुणवत्तेच्या बाबी समजून घेतल्या सेल्फी पॉईंटचे एक वेगळेच आकर्षण होते सर्वांनी याचा आनंद घेतला उपस्थित प्रमुख अतिथीच्या हस्ते नवागतांचे स्वागत गुलाब पुष्प पाठयपुस्तके गणवेश शूज व खाऊ देऊन स्वागत करण्यात आले.सजवलेल्या जिप मधून दाखलपात्र मुलांची जंगी प्रभातफेरी काढली.

शाळेचा  प्रवेशोउत्सवा असून मुलांनो नियमित शाळेत या म्हणजे अपेक्षित यश मिळेल,नियमित अभ्यास करा,शाळेत व घरी आनंदी राहून शिका असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेच्या वित्त व लेखाधिकारी मिनाक्षीताई वाकडे यांनी उपळाई केंद्रातील उपळाई बुद्रुक शाळेत उपस्थित मुलांना व पालकांनाही केले.यावेळी माढा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विकास यादव यांनीही मार्गदर्शन केले.सजवलेल्या जिप मधून दाखलपात्र मुलांची जंगी गावातून  प्रभात फेरी काढण्यात आली.

यावेळी सरपंच प्रतिनिधी गावातील प्रतिष्ठित नागरिक दीपक देशमुख, शाळा व्यवस्थापन समिती च्या अध्यक्षा सिद्धेश्वर आखाडे यांच्या सह गावातील बहुसंख्य लोक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांनी केले.  तर आभार शर्मिला वाघ यांनी मानले. कार्यक्रमाला अनुसरून सुत्रसंचालन दिनेश गुंड यांनी केले.केंद्रातील सर्व शाळेत प्रवेशोउत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.