Breaking

Monday, June 16, 2025

लऊळ(ता.माढा) येथे उदयकीर्ती अर्बन क्रेडिट को सोसायटी लि.या शाखेचे उद्घाटन मा आ.यशवंत (तात्या) माने यांच्या शुभहस्ते व रयतक्रांती पक्ष संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.सुहास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न


मुख्य संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब)                                                                 

लऊळ(ता.माढा) येथे उदयकीर्ती अर्बन क्रेडिट को सोसायटी लि.या शाखेचे उद्घाटन मा आ.यशवंत (तात्या) माने यांच्या शुभहस्ते व रयतक्रांती पक्ष संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.सुहास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

कार्यक्रमाप्रसंगी मा आ.यशवंत (तात्या) माने यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा ही सत्कार करण्यात आला.तात्यांनी आपल्या मनोगत मधून उदय कीर्ती बँकेला वेळोवेळी लागणारी मदत सर्वतोपरी करण्याचे आश्वासन बँकेचे चेअरमन व संचालक मंडळ यांना दिले.

उपस्थित सर्वच मान्यवरांनी आपल्या मनोगतातुन उदय(दादा)माने यांची व उदयकीर्ती अर्बन बँकेची प्रशंसा व कौतुक करत आपल्या पहिल्या लऊळ शाखेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.नेहमीच सामाजिक कार्यामध्ये हिरीरीने पुढाकार घेणारे उदय कीर्ती बँके चे चेअरमन उदय दादा माने यांनी यावेळी जि.प प्राथमिक शाळा,लऊळ च्या सर्व विद्यार्थ्यांना बँकेमार्फत मा आ.यशवंत (तात्या) माने यांच्या हस्ते वह्या वाटप केले.

सदर उदघाटन कार्यक्रमासाठी सर्व संचालक मंडळ,कर्मचारी वर्ग,तसेच श्री संत सावता महाराज यांचे वंशज ह भ प श्री रमेश महाराज वसेकर,सोलापूर जिल्हा दूध संघाचे व्हा चेअरमन श्री दीपक दादा माळी,सोलापूर जिल्हा बँकेचे माजी संचालक श्री भारत भाऊ सुतकर,सरपंच पवन भोंग,चेअरमन श्री उदयदादा माने,व्हा चेअरमन आकाश माने,श्री प्रभाकर भोंग,श्री बंडू नलवडे,श्री वसंत नलवडे,श्री माऊली जाधव सर,श्री महेश पवार,श्री प्रमोद जाधव,मुख्य शाखा अधिकारी साईप्रसाद काळे,संतोष कोळेकर ,मस्के सर ,उज्वल माने ,अनिल वागज प्रीती लंगोटे ,प्रगती काळे, भक्ती पवार, गणेश नलवडे, पिग्मी एजंट ढोरे सर,कावरे सर, भालेराव सर,अर्णव शहा,पृथ्वीराज सुर्वे,विशाल रनपिसे, आकाश दरेकर,आदित्य माळी,माऊली जाधव,आशुतोष व सौरभ माने आदी उपस्थित होते.