Breaking

Tuesday, June 3, 2025

सदभावना रॅली, विश्वपूजा, विश्वआरती, सत्कार आणि पुरस्कार वितरण असा नियोजित विश्वमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जागतिक जयंती महोत्सव बारामतीमध्ये संपन्न. 🚩🚩🚩🚩🚩


मुख्य संपादक : संतोष पांढरे(बारामती)

विश्वमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जागतिक जयंती महोत्सव 2025 शारदा प्रांगण बारामती येथे 1 जून रोजी  संपन्न झाला. सकाळी 11.00 वाजता व्यासपीठ पूजन करून अल्पो पहार सुरु झाला,तो रात्री 11.00 वाजेपर्यंत चालू होता.कार्यक्रमाचे आयोजक  बबनराव आटोळे यांचे आवाहनाला प्रतिसाद देऊन आलेल्या सर्व मान्यवरांच्या आणि  बांधवांच्या उपस्थिती मुळे कार्यक्रम आकर्षक झाला.

पेन्सिल चौक ते शारदा प्रांगण भिगवण चौक पर्यंत फोर व टू व्हीलर सदभावना  रॅली संपन्न झाली. बारामती तालुका दक्षता समितीचे अध्यक्ष अनिलराव आटोळे, यांनी रॅलीचे उदघाटन केले. प्रविण आटोळे यांनी उपस्थिती लावली. अनेक बांधव टू व्हीलर,फोर व्हीलर घेऊन आले होते. तद्नंतर शारदा प्रांगण येथे  विश्वपूजा आणि विश्वआरती ला होळकर घराण्याचे राजे योगेश राजे होळकर, IPS अभिजित चौधर, तृप्तीताई देसाई, सतीशमामा खोमणे, मार्गदर्शक G. B. अण्णा,  नगरसेवक सतीशमामा कोकरे, दूध संघांचे माजी चेअरमन पोपटराव गावडे, कल्याणीताई वाघमोडे, बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष अमृत नेटके, प्रविण आटोळे, सतीश गावडे,सुनिल देवकाते,सखाराम खोत नाना,निखिल बाराते,महेंद्र खटके,मातंग संघटचे अध्यक्ष सोनवणे, वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन चे पदाधिकारी, एकता सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान चे पदाधिकारी, RSS पदाधिकारी, भाजप पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती चे राज्याध्यक्ष अरुण जाधव आणि समितीतील राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, इंदापूर आणि बारामती तालुक्यातील शिक्षक बांधव हजर होते. IPS अभिजित चौधर साहेब, महादेव सातपुते साहेब, पोलीस अधीकारी मुंबई तसेच तानाजी मराडे सर  यांचा सत्कार करण्यात आला.इंदापूर तालुका गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात साहेब यांनी zp शाळा आणि विद्यार्थी यांची गुणवत्ता सुधारावी म्हणून  इंदापूर टॅलेंट सर्च ही परीक्षा यशस्वीपणे राबविली याचा उल्लेख केल्यावर उपस्थितीतांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

43 बांधवांना समाजभूषण आणि 8 अहिल्यारत्न पुरस्कार वितरण व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

IPS अभिजित चोधर यांनी यशापर्यंत कसे पोहोचायचे? यश आणि संघर्ष यावर आपले मनोगत व्यक्त केले. त्यांची यशोगाथा खरंच व केलेले मार्गदर्शन खूपच हृदय स्पर्शी होती.प्रकाश घोळवे, माजी सैनिक भीमराज आरेकर, वाघर चित्रपटाचे निर्माते राजेंद्र बरकडे, धनंजय माने,कल्याणीताई वाघमोडे, तृप्तीताई देसाई तसेच वाफगाव चे राजे योगेश राजे होळकर यांनी आपले विचार मांडले.कॉम्रेड अकॅडमी बारामती चे संचालक आंनद सर व दीपाली बोरकर मॅडम हे MPSC चे क्लासेस घेतात त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जळोची सोसायटी संचालक पदी अनिल आवाळे यांचा सत्कार करण्यात आला. IPS साहेब यांचे विचार ऐकण्यासाठी आलेले कॉम्रेड अकॅडमी चे सर्व युवा वर्ग आपले आपले ध्येय निश्चित करून गेल्याचे दिसून आले. सर्वांनी आपले लक्ष निर्धारित केल्याचे दिसून आले

जवळपास सर्वच जिल्ह्यातील बांधवांचे सहकार्य लाभले. सैनिक समाज पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष  आणि त्यांचे सहकारी, समाजाचे नेते विश्वासराव देवकाते (नाना पाटील), ॲड.गोविंदराव देवकाते, राजाभाऊ कांबळे, भा.ज.पा. जिल्हा अध्यक्ष भेट देऊन गेले. सकाळी 11.00 ते रात्री 11.00 वाजता या वेळेत झालेला हा कार्यक्रम अविस्मरणीय झाला. रांगोळी काढणाऱ्या डॉ.नेहा आटोळे, गौरी आटोळे आणि मित्र परिवार यांचा सर्व महिलांनी सत्कार केला. आचारी काळबेरे, फोटोग्राफर बिबे, माया मच्छिन्द्र मंडप यांचे सत्कार करण्यात आले. निलेश धापटे यांनी सूत्रसंचालन केले.मळद गावचे गावडे तात्या यांनी कार्यक्रम सुंदर झाल्याची प्रतिक्रिया देऊन दरवर्षी कार्यक्रम घ्यावा असे मत व्यक्त केले.

अशा पद्धतीच्या फोटो फ्रेम देऊन 43 बांधवांना समाजभूषण आणि 8 अहिल्यारत्न पुरस्कारकर्त्यांना पुरस्कारीत करण्यात आले.