मावळ प्रतिनिधी :-मंगेश आखाडे
गिरीवासी परिवार आयोजित २ दिवसीय आजोबांची शाळा पाले पठार या ठिकाणी आयोजित केली होती. *!! जे आपले आहे ते जपले पाहिजे!!* या ब्रीद वाक्याप्रमाणे ग्रामीण भागातील जीवन पद्धतीबद्दल लहान मुलांमध्ये आवड निर्माण व्हावी यांमध्ये या सर्व लहान मुलांसाठी विविध ग्रामीण आनंददायी उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये पेरणी, वृक्ष लागवड, गाईचे दुध काढणे,विहिरीत पोहणे, झाडावर चढने, रान भाज्यांची ओळख, जंगल सफारी, कब्बडी, खो खो, जंगलातील घसरगुंडी, सुळकी, योगा, तसेच या वेळी राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवींची होळकर यांच्या ३०० वी जयंती निमित्त त्यांच्या कार्याबद्दल माहिती देण्यात आली. या दरम्यान रानभाज्यांची आणि फणस, अंबे याचा मनसोक्त आनंद घेतला.दोन दिवसात मुलांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण व्हावी म्हणून शिक्षणाचे महत्व, विद्यार्थी संगत आणि त्याचे परिणाम, बाहेर चे खाद्यपदार्थ आणि लहान मूल,चांगल्या सवयी, किशोरवयीन अवस्थेतील बदल, समाजातील घटनाचे होणारे परिणाम , आई वडिलांचे महत्त्व अशा विषयावर मार्गदर्शन आणि संवाद साधण्यात आला. या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून, श्री वैभव आखाडे, प्रा. अशोक कोकळे, सौ, सुमन कोकळे, सौ सुंदरा गोरे, श्री विठ्ठल आखाडे, श्री नारायण शेडगे, कु.रोहन आखाडे, अनंता झोरे, चंद्रकांत खरात यांनी विविध विषयावर मुलांशी संवाद साधला, या वेळी १२ नातवंड, ६ पर्तोंड यांच्यासह पालक वर्ग आवर्जून उपस्थित होते, गतवर्षीच्या गुणवत्तेबद्दल त्यांचे कौतुक करून यापेक्षा अधिक गुणवत्ता मिळावावी यासाठी प्रत्येकाला आजी सौ ठकुबाई कोंडिबा आखाडे यांच्या हस्ते पेढा भरवून तसेच आजोबा श्री कोंडु धोंडू आखाडे यांच्या हस्ते बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले.
आजोबा/ पंजोबा श्री कोंडु धोंडू आखाडे हे अशिक्षित असून त्यांनी कोणत्याही सुविधा नसताना मुलांना कसे शिक्षण दिले तसेच १९८० च्या दशकात उकसान पठार येथील शाळेच्या मंजुरी साठी त्यांनी केलेला ८ वर्षांचा खडतर प्रवास सांगितला, चांगल्या सवयीची जोपासना करा, चुकीच्या मार्गाला जाऊ नका, बाहेर चे खाऊ नका, रोज व्यायाम करा, निर्व्यसनी जीवन जगा आणि भरपूर शिका, कोणतीही परिस्थिती आली तरी शिक्षण सोडू नका असा संदेश दिला.आजी सौ ठकुबाई कोंडिबा आखाडे यांनी अनेक मूल मुली चुकीच्या संगतीत जातात आई वडिलांचे ऐकत नाहीत, त्यामुळे त्यांचे शिक्षण बंद होते, तसेच शिक्षणा शियाव महिलांना खूप संघर्ष करावा लागतो त्यामुळं हीच आपली शिदोरी आहे हे मानून भरपूर शिका आई वडिलांचा विश्वास सार्थकी ठरवा, असा संदेश दिला.सूत्रसंचालन- नामदेव आखाडे, यांनी केले..



