Breaking

Wednesday, June 25, 2025

फुरसुंगी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे (काळभोर )मॅडम यांची तडकाफडकी बदली;ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप वआंदोलनाचा इशारा


पुणे प्रतिनिधी : रवींद्र मोडक

मुख्य संपादक - संतोष पांढरे (बारामती)     

फुरसुंगी-उरुळी देवाची पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मॅडम मंगल मोढवे (काळभोर) यांची अचानक बदली करण्यात आल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून त्यांनी प्रभावी कार्यशैलीने गुन्हेगारीला आळा घालण्याचे आणि कायदा-सुव्यवस्था टिकवण्याचे उल्लेखनीय काम केलं होतं. मोढवे मॅडम यांनी अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीपासून दूर ठेवण्यासाठी समुपदेशन, सराईत गुन्हेगारांविरोधात धडक कारवाई आणि परिसरात शांतता व सुरक्षितता निर्माण करण्यासाठी अनेक ठोस उपाय केले होते. विशेषतः आदर्श नगरसारख्या संवेदनशील भागात धार्मिक तेढ टाळण्यासाठी त्यांनी संयमाने आणि दक्षतेने भूमिका निभावली होती.तथापि, काही समाजकंटक व कथित जिहादी विचारांच्या गटांनी खोट्या तक्रारी करून मोढवे मॅडम यांच्याविरोधात षड्यंत्र रचल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. योग्य चौकशी न करता रातोरात बदलीचे आदेश दिले गेले, ही बाब ग्रामस्थांना मनःस्ताप देणारी ठरली आहे.स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की,"मोढवे मॅडम आल्यापासून गुंडगिरी थांबली, रस्त्यांवर टवाळखोर दिसेनासे झाले. अशा कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांची बदली अन्यायकारक आहे. बदली थांबवण्यात यावी, अन्यथा आंदोलन उभारण्यात येईल."वडकी, उरुळी, फुरसुंगी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी एकत्र येत हा निर्णय मागे घेण्याची मागणी करत, लवकरच संयुक्त आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

ग्रामस्थांच्या मते, मोढवे(काळभोर मॅडमसारखे निःपक्ष, सजग आणि संवेदनशील अधिकारी या परिसराला अत्यंत आवश्यक आहेत. अशा अधिकार्‍यांना पाठबळ देऊन कार्यकाळ वाढवावा, ही जनतेची स्पष्ट मागणी आहे.दरम्यान, मोढवे(काळभोर) मॅडम यांच्या समर्थनार्थ फुरसुंगी परिसरातील पुणे-सासवड रस्त्यावर नागरिकांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन केलं. जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी मॅडम यांना बदली रद्द करण्याचं आणि त्यांना परत आणण्याचं मागणीनिहाय समर्थन दर्शवलं.


मात्र, ही बाब मोढवे मॅडम यांच्या लक्षात आल्यानंतर नागरिकांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं. “शासनावर विश्वास ठेवा. आपण रस्ते अडवून सामान्य जनतेला अडचणीत टाकू नका. मी तुमच्या भावना समजून घेते, पण कायदा हातात न घेता शिस्तीतपणे आपली मागणी पोहोचवणं महत्त्वाचं आहे,” असं सांगून त्यांनी सर्वांना शांत केलं आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी सर्व नागरिकांना विनंती केली.