Breaking

Friday, June 27, 2025

व्यवसायाचा गुणात्मक दर्जा सुधारला तरच नवनिर्मिती करणारी पिडी घडेल : केंद्रप्रमुख दिगंबर काळे


मुख्य संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब)                                                                              

पण जो व्यवसाय पेशा स्वीकारला  त्याच्याशी प्रामाणिक राहून त्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवा प्रामाणिक पणे केलेले काम नक्कीच यशस्वी होते.कामासाठी प्रयत्नशील रहा प्रयत्नांची पराकाष्ठा करा.सकारात्मक राहून बदल स्वीकारा यामुळे आपले उद्दिष्ट साध्य होते. शिक्षक बदलला तर शिक्षण बदलेल,शिक्षण बदलले तर समाज बदलेल यासाठी आखावी व रेखीव काम करा.जीवन समृद्ध होईल. आपल्या व्यवसायाचा गुणात्मक दर्जा सुधारला तर नवनिर्मिती करणारी पिडी घडेल असे मत केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांनी उपळाई बुद्रुक केंद्राच्या शिक्षण परिषदेत मार्गदर्शन करताना व्यक्त  केले.

अध्ययन स्तरचा आढावा  कृती आराखडा यावर नानासाहेब ढेरे,  सकिना आतार, बंडू भोरे यांनी वार्षीक नियोजन ,घटक नियोजन या गोष्टीं किती महत्वपूर्ण आहेत ते; पांडुरंग शिंदें यांनी निपुण महाराष्ट्र कार्यक्रम व अध्ययन स्तर मूल्यमापन यावर प्रगती पाटील यांनी पीएमई यावर धनाजी घाडगे यांनी उत्कृष्ट व उपयुक्त मार्गदर्शन केले.

प्रथम माय सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन दशरथ देशमुख व  मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक  व सूत्र संचालन  शहाजी क्षीरसागर यांनी  केले.आभार पांडुरंग शिंदे यांनी मानले.केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते.