Breaking

Tuesday, June 24, 2025

श्रद्धा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकी जपत पुरंदर पंचायत समिती व जिल्हा पशु संवर्धन विभागाचे कार्य संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी



     

पालखी सेवा हे केवळ कर्तव्य नाही, तर श्रद्धेचे समर्पण – पुरंदर पशुसंवर्धन विभागाचे कार्य वाखाणण्याजोगे!

पुणे प्रतिनिधी : रवींद्र मोडक

मुख्य संपादक : संतोष पांढरे(बारामती)

सासवड दिनांक 24जून 2025 सालाबादप्रमाणे यावर्षीही संत ज्ञानेश्वर माऊली व संत सोपानकाका यांच्या पालख्या सासवड येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवत आहेत. माऊलींची पालखी जेजुरी मार्गे तर सोपानकाकांची पालखी परिंचे मार्गे बैलांच्या सहाय्याने नेली जाते. 

या पालखी सोहळ्यातील एक अत्यंत महत्त्वाचा  राहणारा भाग म्हणजे – या बैलांचा व अश्वांचा आरोग्यसेवा व्यवस्थापन.यावर्षीही जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती पुरंदर आणि पशुसंवर्धन विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी अहोरात्र सेवा देत आहेत. ते बैल व अश्वांना यथोचित वैद्यकीय उपचार, शक्तिवर्धक औषधोपचार आणि अन्न पुरवठा मोफतपणे करीत आहेत.या कार्यात खाजगी औषध उत्पादक कंपन्याही उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या आहेत. 

मॅनकाइंड व नॅचरल रेमेडिज या नामांकित कंपन्यांनी एनरडायना अॅडव्हान्स, ग्लुका बुस्ट यांसारख्या औषधांचा पुरवठा पशुसंवर्धन विभागामार्फत मोफत केला आहे.या सेवेमध्ये पुढील मान्यवरांची उल्लेखनीय भूमिका आहे:मॅनकाइंड कंपनीचे वरिष्ठ अधिकारी श्री. संग्राम मोहिते व श्री. अभिषेक पाटील नॅचरल रेमेडिजचे श्री. आकाश बाबरपशुवैद्यकीय चिकित्सालय, परिंचेचे डॉ. अर्चना जगताप सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रवीण कारंजकर खाजगी पशुवैद्यक: डॉ. संदीप नवले, डॉ. सौरभ जाधव, डॉ. निलेश जगताप, डॉ. शुभम दुधाळ, डॉ. शुभम कुंभार जनऔषधी केंद्र, परिंचेचे प्रमुख श्री. अविनाश नवले 

पालखी व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक ठरलेल्या डॉ. अस्मिता सताळकर यांच्या नेतृत्वाखाली खालील डॉक्टर्स व परिचर कार्यरत होते.डॉ. शिलामन आगम (पिसर्वे), डॉ. रविराज ताकवले, डॉ. मांडगे (गराडे), डॉ. आदेश निकम (केतकावळे), डॉ. भोर (काळदरी), डॉ. बंगार (वाल्हा), डॉ. संभाजी भंडलकर (गुळूंचे), डॉ. श्रीरामे (नायगाव), डॉ. धायगुडे (दिवे), डॉ. अक्षय भिसे तसेच परिचर वर्गातील श्री. गणेश मोरे, श्री. मयुर काजरेकर, श्री. तुषार जगताप, श्री. पाटोळे, श्री. किरण खळदकर, श्री. धिवार यांनी अतिशय मोलाचे योगदान दिले.अपघातानंतरही सेवा थांबली नाही – कर्तव्यनिष्ठेचा सर्वोच्च उदाहरण यंदाच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने बैलांवरील ताण अधिक होता. सासवड येथे बैलांवर उपचार करत असताना डॉ. अस्मिता सताळकर आणि परिचर श्री. मयुर काजरेकर यांचा दुचाकी अपघात झाला. दोघांच्याही पायाला इजा झाली तरी, त्यांची सेवा मात्र थांबली नाही. हा त्यांचा समर्पणाचा आणि सेवाभावाचा अद्वितीय प्रत्यय होता.माऊलींचे व सोपानकाकांचे आशीर्वाद लाभलेल्या या सेवाव्रतींना समाजाकडून भरभरून कौतुक मिळत आहे.

पुरंदर पंचायत समिती व जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे हे कार्य संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. ही केवळ सेवा नाही, तर श्रद्धा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकीचे जिवंत उदाहरण आहे.