मावळ प्रतिनिधी :- मंगेश आखाडे
मावळ तालुक्यात डोंगर पठारावर मोठ्या प्रमाणात धनगर, आदिवासी समाज राहतो, येथे लोकांची उपजिविकेचे साधन म्हणजे पावसावर आधारित भात, नाचणी, वरई, सावा , तिळ ही पिके घेतली जातात. या वर्षी पाऊसाचे अस्मानी संकट वेळेच्या खूप आधीच आल्याने अनेक शेतीतील कामे खोळंबली त्यामध्ये भात शेतात टाकण्यात येणारे शेणखत, तसेच फेर पालट आड पद्धतीने घेण्यात येणाऱ्या पिकांमध्ये रानवा तोडून राबखतावर घेण्यात येणाऱ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
रानवा म्हणजे मालकी हक्कातील झाडे, झुडपे तोडून त्याचे सर्व काटे, झाडांच्या फांद्या, तोडून त्यातील लाकडे काढली जातात, ती लाकडे पुढील ४ महिने सरपण म्हणून पावसाळ्यात चुली साठी कामी येतात. उर्वरित काटे, पाचोळा, गवत या सर्वांचे मे महिन्याच्या शेवटच्या १५ दिवसात रानवा पेटविला जातो. पेटविलेल्या राखेच्या जागेवर नाचणी, वरई याची पेरणी करून रोपे तयार केली जातात. त्या रोपांची डोंगर उतारावर तासी किंवा आवटी पद्धतीने लागवड करून नाचणी आणि वरई ची लागवड केली जाते.परंतु या वर्षी अचानक सुरू झालेल्या पावसामुळे या भागातील शेतकऱ्याचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे.पावसाळ्यात अचानक सातत्याने मोठ्या प्रमाणात पाऊस लागू झाला तर अनेक दिवस गायी, म्हैस घरात सांभाळाव्या लागतात त्यावेळी त्यांना वैरण म्हणून पेंढ्याची साठवण केली जाते. ती वैरण डिसेंबर मध्ये झाडावर ठेवली जातात. मे च्या शेवटी घरात साठवली जाते. परंतू या वर्षी अचानक अस्मानी संकट आल्याने गाई, म्हैसी सह पुढील चार महिने बैलांची वैरण ही भिजल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
गाई म्हशीच्या शेणाना पासून वर्षभरापासून साठवलेले शेणखत गोवरचे गोवर ओले झाल्यामुळे रोपांच्या भाजणीसाठी वापरता येत नाही. अचानक आलेला पावसामुळे पेरणी खोळंबली आहे
शेतकरी बाळू आखाडे



