मावळ प्रतिनिधी - मंगेश आखाडे
रयत संकुल वडगाव मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून २०२५ रोजी, ११ वाजता योग दिन विद्यालयामध्ये उत्साहात साजरा झाला. सकाळी ७.३० वा आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक साहिल गुंड यांनी सुमारे १ तास विद्यार्थी व शिक्षक यांची योग प्रात्यक्षिके करून घेतली.या कार्यक्रमासाठी पुणे विपश्यना समितीचे अरविंद ढवण आणि गायकवाड सर हे उपस्थित होते. यावेळी क्रीडा प्रमुख गणेश शेंडगे यांनी प्रास्ताविक केले. तर विद्यालयाचे प्राचार्य सतीश हाके यांनी सर्वांना योगदिना निमित्त शुभेच्छा दिल्या,आणि योगाचे दैनंदिन आयुष्यातील महत्त्व सांगितले.
कार्यक्रमासाठी प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जयश्री लेंभे तसेच इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सुनिता बारवकर, पर्यवेक्षिका प्रज्ञा गायकवाड उपस्थित होत्या. आनापन, प्राणायम तसेच विविध आसने यामध्ये वृक्षासन, ताडासन, वज्रासन, कोनासन, इ. योगासने करुन घेतली. तसेच प्रत्येक आसनाचे महत्व सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रकारे योगासने केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निता शेटे यांनी केले. उपस्थित सर्वांचे आभार प्रविण ढवळे यांनी मानले.



