पुणे प्रतिनिधी : रवींद्र मोडक
मुख्य संपादक : संतोष पांढरे (बारामती)
"प्रथम जनता – मग सत्ता" या तत्त्वावर विश्वास ठेवत आज पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली पहिले 'जनता दरबार' आणि त्यानंतर नियोजन बैठक अशा दोन महत्त्वपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.जनता दरबारात थेट संवाद–समस्या ऐकून त्वरित उपाययोजना.सकाळी शिवसेना कार्यालयात झालेल्या जनता दरबारात, मतदारसंघातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी आपल्या समस्या आणि सूचना मांडल्या.पाणीटंचाई, खराब रस्ते, वीजपुरवठा, शिक्षण, आरोग्य या मुलभूत अडचणींसह स्थानिक प्रश्नही समोर आले.मा.आमदार विजय बापू शिवतारे यांनी प्रत्येक नागरिकाचे म्हणणे गंभीरतेने ऐकून घेतले आणि संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले.बापूंनी नमूद केले “लोकशाहीत थेट संवाद अत्यावश्यक आहे. अशा संवादातूनच खऱ्या समस्या समजतात आणि त्या सोडवण्यासाठी मार्ग निर्माण होतो.”नंतर झालेल्या नियोजन बैठकीत आगामी निवडणुकांसाठी स्पष्ट दिशा ठरवण्यात आली.जनता दरबारानंतर लगेचच सासवड येथे शिवसेनेच्या नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये पुरंदर-हवेली मतदारसंघातील सर्व शिवसेना पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, युवासेना व महिला आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व ग्रामपंचायत निवडणुकांची रूपरेषा, रणनीती आणि पक्षशिस्त यावर सखोल चर्चा झाली.बापूंनी स्पष्ट सांगितले,“ज्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे आहे त्यांनी आतापासून तयारीला लागावे, अर्ज दाखल करावेत आणि जनतेशी थेट संपर्क वाढवावा.”संवादातून विश्वास,नियोजनातून विजय!आजचा उपक्रम फक्त राजकीय बैठक नव्हता, तर तो शिवसेनेच्या लोकाभिमुखतेचा आणि शिस्तबद्ध संघटनशक्तीचा उत्कृष्ट नमुना ठरला.जनतेच्या अडचणी समजून घेऊन, त्यावर काम करत
थेट संवादातून उपाययोजना आणि निवडणुकीची तयारी करण्याचा हा प्रगल्भ मार्ग आहे.शिवसेना पदाधिकाऱ्यांची आगामी निवडणुकांसाठी ठोस रणनीती आखणारी नियोजन बैठक, बापूंच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडली.




