मुख्य संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब)
आष्टी उपसा सिंचन योजनेचे मागील दोन पाळ्यांचे कमी प्रमाणात पाणी आले असुन, मौजे मोडनिंब हद्दीतुन सुमारे सात - आठ बंधारे व एक मोठे (व्यवहार तळे, श्रीखंडे तळे) तळे भरणे आत्ता गरजेचे असुन याकरीता अतिरिक्त साठ्यातून हे कालवे,तळे भरण्यात यावे तसेच तेलंगवाडी ता.मोहोळ येथील शेतकरी घोलप यांचे कैनल लिकेज मुळे अतोनात नुकसान होत आहे.
यात तातडीने लक्ष घालून आपल्या कार्यालयामार्फत त्या परीसरात पाईप द्वारे पाणी पुरवठा करून शेतक-याचे होत असलेले नुकसान टाळावे.असे दिपक (आबा) सुर्वे - उ बा ठा शिवसेना गट प्रमुख, मोडनिंब यांनी मा.अधिक्षक अभियंता सोलापूर व कार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता यांना विनंती वजा निवेदन दिले आहे.



