मावळ प्रतिनिधी : मंगेश आखाडे
वडघर गावच्या सरपंच सुवर्णाताई नथुराम डोईफोडे यांना अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड यांच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अहिल्यारत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे.वडघर गावच्या सरपंच सौ. सुवर्णाताई नथुराम डोईफोडे यांचे सामाजिक क्षेत्रात फार मोठे योगदान आहे. गावात सामाजिक सलोखा राखण्यासाठी त्या नेहमी अग्रेसर असतात.गावात शैक्षणिक क्षेत्रातही त्यांच्यामुळे नवी क्रांती झाली असून शैक्षणिक दर्जा सुधारला आहे.सरपंच सौ. सुवर्णाताई नथुराम डोईफोडे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड यांच्या वतीने पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे.
या पुरस्कारमुळे त्यांचे पंचक्रोशीत आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यात अभिनंदन करण्यात येत आहे.ही गौरवस्पद संधी अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त आयोजित विशेष समारंभात मिळाली. माजी आमदार रामहरी रुपनवर, ऑल इंडिया धनगर समाजाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे,राजेवाडी येथील श्री. श्री. सद्गुरु कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील यांच्या हस्ते सरपंच सुवर्णाताई डोईफोडे यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.या कार्यक्रमाला ऑल इंडिया धनगर महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख तुकाराम दादा कोकरे, अध्यक्ष अनंतराव कचरे, मावळ अध्यक्ष बाबुराव शेडगे, उपाध्यक्ष नथुराम डोईफोडे, अक्षय डोईफोडे, वैभव मरगळे यांची विशेष उपस्थित होते.



