Breaking

Thursday, June 5, 2025

मा.सोलापूर जिल्हा अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेच्या अनुषंगाने टेंभुर्णी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचे पोलीस ठाण्याच्या वतीने शहरात " वृक्ष दिंडी "


जागतिक पर्यावरण दिन औचित्य....

मुख्य संपादक : संतोष पांढरे(मोडनिंब)

सोलापूर जिल्हा अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून हरित वारी हा उपक्रम सध्या सोलापूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. 5 जून ते 4 जुलै पर्यंत 10 लाख वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट आहे.त्या अनुषंगाने जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्या करिता व पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्या करीता पोलीस ठाण्याच्या वतीने टेंभुर्णी शहरात वृक्ष दिंडीचे आयोजन पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी केले होते.सदर कार्यक्रमा मध्ये टेंभुर्णी पोलीस ठाणे मधीलअधिकारी व अंमलदार, रोटरी क्लब चे अध्यक्ष व सदस्य, टेंभुर्णी ग्रामपंचायत सरपंच व सदस्य व  टेंभुर्णी शहरातील नागरिक, टेंभुर्णी पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील, पत्रकार मित्र यांनी सहभाग घेतला होता सदर कार्यक्रमामध्ये झाडे लावा झाडे जगवा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे असे टाळ मृदंगाच्या गजरात वृक्ष लागवड करण्यात बाबत नागरिकांमध्ये संदेश देऊन आपापले गावांमधील मोकळी मैदाने, शासकीय कार्यालय, पालखी मुक्कामाचे ठिकाणी व पालखी मार्गावर  दुतर्फा झाडे लावणे चे आवाहन पोलीस ठाण्यासह रोटरी क्लब व ग्रामपंचायत कार्यालय टेंभुर्णी यांचे वतीने करण्यात आले. 

तसेच वृक्षदिंडी कार्यक्रम संपल्यानंतर नागरिकांना  कैलास पत्ती,रेन ट्री,कांचन,पिंपळ, कोणोकोरपस,चिंच,सिताफळ ,आंबा ,करंज या प्रकारच्या 150 रोपांचे वाटप ही करण्यात आले.