Breaking

Monday, June 30, 2025

श्री संत गजानन महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात उळे(ता.द सोलापूर) येथे आगमन होताच श्रद्धापूर्वक, भक्तिमय वातावरणामध्ये उत्साहात, स्वागत !


मुख्य संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब) 

                     || गण गण गणात बोते ||                         

शेगावहून पंढरपूरकडे निघालेल्या श्री संत गजानन महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन होताच, पालखीचे स्वागत आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, उपसरपंच नेताजी भाऊ खंडागळे, जिल्हा प्रशासन, उळे आणि पंचक्रोशीतील नागरिक यांच्या उपस्थितीत पार पडले.

"साधू संत येते घरा, तोचि दिवाळी दसरा" या ओवीप्रमाणे उळेगाव भक्तीमय रंगले.पहिला मुक्काम उळे (ता.दक्षिण सोलापूर) येथे मोठ्या श्रद्धा, भक्ती आणि उत्साहात झाला.

उळे ग्रामस्थांकडून राहण्याची व महाप्रसादाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती.

||                           ||गण गण गणात बोते ||