पुणे प्रतिनिधी : रवींद्र मोडक
संपादक : संतोष पांढरे(बारामती)
कर्वेनगर, पुणे प्रभाग क्रमांक ३६ कर्वेनगरमधील महर्षी कर्वे शाळेकडून हिंगणे होम कॉलनीच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेला मातीचा ढिगारा अखेर हटवण्यात आला आहे.
विशेष बाब म्हणजे, ही त्वरित कारवाई नागरिकांच्या तक्रारीनंतर अवघ्या एका तासात करण्यात आली.या मार्गावर काही दिवसांपूर्वी L&T कंपनीमार्फत पाण्याच्या मुख्य लाईनचे काम तसेच ड्रेनेज आणि पावसाळी चेंबरचे काम झाले होते. मात्र, कामानंतर रस्त्यावर मातीचा ढिगारा तसाच राहिल्यामुळे नागरिकांना आणि वाहनचालकांना रोज अडथळा सहन करावा लागत होता.ही समस्या लक्षात घेत कर्वेनगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (SP) च्या अध्यक्षा पल्लवी किशोर शेडगे आणि अध्यक्ष किशोरभैय्या शेडगे यांनी 8 जुलै 2025 सकाळी प्रशासनाकडे तक्रार केली.त्याची तातडीने दखल घेत, आज सकाळी ११:३० वाजता काम सुरू करून रस्त्यावरून माती हटवण्याचे काम सुरू करण्यात आले."प्रशासनाने वेळेवर दिलेला प्रतिसाद वाखाणण्याजोगा आहे. अशा सकारात्मक कृतीमुळे जनतेचा विश्वास वाढतो," अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.या कामामुळे रस्त्यावरचा अडथळा दूर झाला असून नागरिकांच्या आणि शाळकरी विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवास मोकळा झाला आहे.वारजे-कर्वेनगर परिसरातील नागरिकांच्यावतीने प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.




