Breaking

Tuesday, July 15, 2025

आषाढी वारीच्या उत्कृष्ट नियोजना बद्दल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा सत्कार


सोलापूर प्रतिनिधी : गजानन बंदीचोडे

मुख्य संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब)

महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणीच्या आषाढी वारीचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा भाजपचे जिल्हा चिटणीस यतीन शहा यांनी भंडारकवठे ग्रामस्थांतर्फे सत्कार केला.पंढरपूरच्या आषाढी वारीला महाराष्ट्र, कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणासह देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक आणि वारकरी  पायी चालत पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेले असतात. त्यामुळे एकादशी दिवशी पंढरपुरात अभूतपूर्व गर्दी होते.या वारीत वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये. वारकऱ्यांसाठी पोलीस संरक्षण व्यवस्था,निवास आणि आरोग्य स्वच्छता यासह विविध सुविधा योग्य पद्धतीने पुरविण्यात आलेली होती.यावेळी या काळामध्ये कोणताही अनुसूचित घटना आणि गोंधळ झाला नाही.ही वारी अतिशय शिस्तबद्ध आणि शांततेत आणि धार्मिक वातावरणात पार पडली आहे.यामध्ये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा मोठा वाटा आहे त्यांचे कार्याचे कौतुक करण्यासाठी भंडारकवठे ग्रामस्थांची वतीने भाजपचे जिल्हा चिटणीस यतीन शहा यांनी जिल्हाधिका-यांचा सत्कार केला.यावेळी भाजपाचे राज्य परिषदेचे नूतन सदस्य हनुमंत कुलकर्णी महेश मेंगजी आदी उपस्थित होते.