मुख्य संपादक : संतोष पांढरे(मोडनिंब)
मुंबई उच्च न्यायालयातील अधिवक्ता अॅड. वैभव आर. गरगडे यांनी भारताच्या राष्ट्रपती यांच्याकडे मुंबईत सर्वोच्च न्यायालयाची सर्किट बेंच स्थापन करण्याची अधिकृत लिखित मागणी केली आहे.
अॅड. वैभव गरगडे यांच्या मते, देशाच्या पश्चिम व दक्षिण भागातील — महाराष्ट्र, गोवा, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, केरळ व अन्य केंद्रशासित प्रदेशांतील नागरिकांना दिल्लीपर्यंत न्यायासाठी प्रवास करावा लागतो, जो वेळखाऊ, खर्चिक व अनेक वेळा अडचणीचा ठरतो. या राज्यांच्या दुर्गम भागातील लोकांना दिल्ली सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणे अशक्यप्राय आहे. त्यामुळे मुंबईत सर्वोच्च न्यायालयाची सर्किट बेंच झाली, तर या भागातील लाखो नागरिकांना थेट व सहज न्याय मिळू शकेल.ही मागणी भारतीय संविधानातील अनुच्छेद 39A नुसार करण्यात आली असून, सर्व नागरिकांना न्यायाची समान संधी उपलब्ध झाली पाहिजे, हे या मागणीचे मुख्य कारण आहे.सदर मागणीची प्रत पुढील संस्थांना सुद्धा पाठवण्यात आली आहे:
▪️ सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
▪️ पंतप्रधान कार्यालय
▪️ केंद्रीय गृह मंत्रालय
▪️ कायदा व न्याय मंत्रालय
▪️ बार कौन्सिल ऑफ इंडिया
▪️ महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल
अॅड. गरगडे यांच्या म्हणण्यानुसार, “मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि भौगोलिकदृष्ट्या सर्किट बेंचसाठी अत्यंत योग्य ठिकाण आहे.” न्याय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने लवकरात लवकर ही मागणी मान्य करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.



