Breaking

Friday, August 15, 2025

श्री दत्त शिक्षण संकुलात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह


मुख्य संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब)

श्री दत्त शिक्षण संकुलात आज भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

ध्वजारोहण संस्थेचे संचालक मा. श्री. दिग्विजय कांबळे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी संस्थेचे सचिव प्रकाश इंगळे, पोपट काका दोभाडा, अनंता बागल, हनुमंत कुंभार गुरुजी, आनंद सुर्वे, लक्ष्मी पाटील, स्मिता सावंत, निलेश गिड्डे, प्रकाश सुरवसे, शिवाजी ढगे, ढगे मॅडम, सुप्रिया कोळेकर मॅडम, प्राचार्य रणदिवे सर, मुख्याध्यापक सरडे सर, सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


स्वातंत्र्य दिनानिमित्त बालचमुंनी सैनिक वेशभूषा परिधान केली होती व हातात तिरंगा ध्वज घेत वाजतगाजत प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभात फेरीच्या वेळी शफिक फाउंडेशनतर्फे सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

संजीवन विद्यालयाचे प्राचार्य मा. सुभाष रणदिवे यांनी प्रास्ताविक करताना शाळेत घेतल्या जाणाऱ्या स्कॉलरशिप, दहावी-बारावी परीक्षांचे निकाल, "अंतर्नाद" सारख्या उपक्रमांची माहिती पालकांसमोर मांडली. त्यांनी स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारकांच्या संघर्षाची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली.

यावेळी इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले. तसेच काही पालकांनी विद्यार्थ्यांना खाऊ व शैक्षणिक साहित्य वितरित केले. 

या उपक्रमासाठी प्रकाश इंगळे, अनंता बागल, गणेश सावंत, दीपक रोकडे, दादा पवार, मुरारी रेपाळ यांचे विशेष सहकार्य लाभले. व्यक्तिमत्व विकास स्पर्धेतील विजेत्यांना शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.