१७७ वधू-वरांची नोंदणी, ५५० पालक-नातेवाईकांची उपस्थिती
पंढरपूर प्रतिनिधी : सुनील चांदणे
मुख्य संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब)
स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने उपजिल्हा रुग्णालय, एआरटी सेंटर, जिल्हा एड्स नियंत्रण संस्था, समुपदेशन केंद्र व NSOP + समग्र प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “रेशीम गाठी वधू-वर परिचय मेळावा” उपजिल्हा रुग्णालय एआरटी सेंटर हॉल, पंढरपूर येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक धोत्रे यांच्या शुभहस्ते राष्ट्रगीत गायन व दीपप्रज्वलन करून झाले. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी शुभेच्छा दिल्या.प्रास्ताविक करताना एसएमओ डॉ. सयाजी गायकवाड यांनी सांगितले की, हा परिचय मेळावा एचआयव्ही संक्रमित वधू-वरांना सहजीवनाची नवी दिशा देणारा सामाजिक उपक्रम आहे. विवाहात होणारा आर्थिक खर्च टाळून शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या मेळाव्यात राज्यभरातील 177 वधू-वरांची नोंदणी झाली असून सुमारे 550 पालक व नातेवाईकांची उपस्थिती लाभली. भोजनदानाची व्यवस्था पालवी संस्था अध्यक्षा मंगल शहा यांनी केली.कार्यक्रमाला डॉ. प्रदीप केचे, डॉ. प्रसन्न भातलवांडे, मा. कृष्णा सकट (जिल्हा एड्स नियंत्रण संस्था), डॉ. अविनाश उईके, डॉ. बालाजी बिराजदार, डॉ. संभाजी भोसले, डॉ. वनिता कार्यकर्ते, समाधान माळी, विजय बाहुले आदी मान्यवर उपस्थित होते.मेळावा यशस्वी करण्यासाठी नागेश देवकर, संतोष शेंडगे, दीपक गोरे, युवराज वांगी, संदीप देशमुख, मीनाक्षी कदम, बाजीराव नामदे, एजाज बागवाण, स्वाती कसबे, रुपाली देवकर, गायकवाड मॅडम, बाळासाहेब पांढरे, भगवत भोसले आदींनी विशेष परिश्रम घेतले. तर राजश्री टकले, किशोर जाधव, सुनिल चांदणे, मीनाक्षी रणदिवे, संतोष चव्हाण, सोनल आगलावे, डॉ. सत्यवान यादव, कीर्ती मस्के, सुवर्णा लोकरे, सत्यवान कांबळे, मेघा चंदनशिवे, तुकाराम साठे, धनंजय कुंभार, भारत सोनवले, बबीता डावरे व विशाल सर यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.सुत्रसंचालन पुरुषोत्तम कदम यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. अविनाश उईके यांनी केले.
🔹 उपजिल्हा रुग्णालय, ART सेंटर व समग्र प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
🔹 डीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन; जिल्हाधिकारी व सीईओंचे मार्गदर्शन
🔹 पालवी संस्थेकडून भोजनदानाची व्यवस्था
🔹 मान्यवरांच्या उपस्थितीत सामाजिक संदेश देणारा उपक्रम



