Breaking

Friday, August 15, 2025

लोकशक्ती शुगर प्रा. लि.,औराद येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा


दक्षिण सोलापूर प्रतिनिधी – गजानन बंदीचोडे

संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब)

दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथील लोकशक्ती साखर कारखान्याच्या परिसरात 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.ध्वजवंदनाने लोकशक्ती साखर कारखाना दुमदुमला. 

या कार्यक्रमात कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विजय मराठे यांनी ध्वजवंदन करून उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.आपल्या भाषणात श्री. मराठे यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, "जशी तुम्ही सध्या जबाबदारीने काम करत आहात, तशीच निष्ठा व तत्परता पुढेही कायम ठेवा. येत्या ऑक्टोबर महिन्यात कारखान्याचे गाळप सुरू होणार आहे, त्यामुळे दिलेल्या वेळेत सर्व काम पूर्ण करणे आवश्यक आहे."यावेळी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन श्री. मराठे यांनी सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व कर्मचारी वर्गास गाळपा च्या दृष्टीने आवाहन केले.

एकंदरीत एकात्मता, देशभक्ती आणि विकासाचा संदेश देत स्वातंत्र्य दिन साजरा झाला.कार्यक्रमाच्या शेवटी एच. आर. मॅनेजर श्री. सचिन मळगे यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.