Breaking

Tuesday, August 5, 2025

मोडनिंब कन्या व अक्कलकोटची सून ठरली ‘मिसेस अष्टपैलू श्रावण क्वीन ऑफ अक्कलकोट’


इनरव्हील क्लब अक्कलकोटचा उपक्रम उत्साहात पार – आरोग्य सत्र व पदग्रहण सोहळ्याला महिलांचा मोठा प्रतिसाद

मुख्य संपादक – संतोष पांढरे (मोडनिंब)

इनरव्हील क्लब अक्कलकोटच्या वतीने आयोजित ‘अष्टपैलू श्रावण क्वीन’ या विशेष स्पर्धेत मोडनिंब येथील कन्या आणि अक्कलकोटची सून तनिष्का शुभम शहा हिने प्रथम क्रमांक पटकावून ‘मिसेस अष्टपैलू श्रावण क्वीन ऑफ अक्कलकोट’ हा किताब पटकावला. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ती मोडनिंबचे माजी उपसरपंच विशाल मेहता यांची कन्या असून अक्कलकोट येथे तिचे सासर आहे.

या उपक्रमाअंतर्गत क्लबचा पदग्रहण सोहळा तसेच महिलांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले होते.गर्भाशयाच्या कॅन्सरविषयी जागृती या विषयावर आरोग्य सत्रात डॉ. सुवर्णा मलगोंडा व डॉ. सुमा मलगोंडा यांनी महिलांना सखोल मार्गदर्शन केले. या सत्राचा शेकडो महिलांनी लाभ घेतला.पदग्रहण सोहळ्यात अनुराधा चंडक यांच्या हस्ते नूतन कार्यकारिणीने पदभार स्वीकारला. प्रमुख अतिथी म्हणून दीपा पवार व अर्चना जाजू उपस्थित होत्या. क्लबच्या अध्यक्षा रुपाली शहा यांनी प्रास्ताविक केले, तर अहवाल सलोनी शहा यांनी सादर केला.स्पर्धेचे उद्घाटन डॉ. मंजुषा मेंथे आणि मल्लम्मा पसारे यांच्या हस्ते करण्यात आले.परीक्षक म्हणून पूनम कोकळगी आणि सोनिया चंकेश्वरा यांनी भूमिका बजावली.

🔹 स्पर्धेतील विजेत्या –

विनिता बिराजदार – मिस श्रावण क्वीन

तनिष्का शहा – मिसेस अष्टपैलू श्रावण क्वीन (प्रथम क्रमांक)

अक्षता मुसळे, श्वेता कदम, आफिया शेख, विद्या मंजुळे, मयूरी टोणे, सृष्टी मसुते, अनुजा कँपे, शीतल पवार, अनुजा शहा – यांना विविध पारितोषिके

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती रणसुभे आणि युगा शहा यांनी केले. वृत्तलेखन चंचल जाजू, तर आभार प्रदर्शन सुचित्रा साखरे यांनी केले.कार्यक्रमास शीला माशाळे, सुरेखा माशाळे, कीर्ती हिंडोळे, पवित्रा मलगोंडा, कला पटेल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

‘ब्युटी विथ ब्रेन’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या या स्पर्धेत तनिष्का शहा हिने तिच्या अष्टपैलू, आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर हा बहुमान पटकावला. तिच्या यशाबद्दल सोशल मीडियावर आणि सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.